Take a fresh look at your lifestyle.

दिग्गज खेळाडूंना ड्रॉप करण्याविषयी भारताच्या माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन टी-२० सामन्यांची सीरिज झाली. आतापर्यंत भारताने दोन टी-२० सामन्यांमध्ये विजयमिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाने सीरिजवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. मात्र, या दोन्ही सामन्यादरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसला. एरव्ही धावांचा डोंगर उभारणारा विराट इंग्लंडच्या सीरिजमध्ये फेल ठरला असं म्हणता येईल. मैदानावर विराट फलंदाजीला येतो तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात.

आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा; राष्ट्रीय बाल आयोगाचा आदेश

परंतु, सध्याचा काळ विराटसाठी थोडा कठीण असून त्याच्या फॉर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. एक काळ असा होता, ज्यावेळी तुमच्या प्रतिष्ठेचा विचार न करता आऊट ऑफ फॉर्म असल्याने टीममधून ड्रॉप केले जायचे, असं म्हणत प्रसाद यांनी नाव न घेता विराटवर टीप्पणी केली आहे.

व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं की, पूर्वीचा काळ असा होता की, तुम्ही स्टार खेळाडू असले, पण तुम्ही आऊट ऑफ फॉर्म असल्यास तुम्हाला टीममधून बाहेर काढलं जात होतं. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग,युवराज सिंग,जहीर खान, हरभजन सिंग या सर्वांना एकेकाळी ड्रॉप केलं गेलं आहे. जेव्हा हे दिग्गज खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते तेव्हा त्यांना पुन्हा घरेलू क्रिकेटमध्ये धावा कराव्या लागल्या. त्यानंतरच या सर्वांनी टीम इंडियामध्ये पुन्हा पुनरागमन केलं.

धक्कादायक! दाट जंगल आणि पाऊस; भीमाशंकर ट्रेकिंग दरम्यान ६ तरूण बेपत्ता

आता आऊट ऑफ फॉर्म असल्यावर खेळाडूंना विश्रांती दिली जाते. मात्र, पुढे जाण्यासाठी हा विकल्प योग्य नाही. देशात खूप टॅलेंट आहे आणि तु्म्ही फक्त नावासाठी खेळू शकत नाही. भारताचे सर्वोत्कृष्ठ मॅच विनर अनिल कुंबळे यांनाही अनेकदा टीम इंडियातून बाहेर केलं होतं, असंही प्रसाद यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.