Take a fresh look at your lifestyle.

आशिया कपमध्ये इंडियाचा रोमांचक विजय; पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवारांचा जल्लोष

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

Ind Vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत-पाकिस्तान सामना (India-Pakistan match) भारताने पाच गडी राखून जिंकला. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) शेवटच्या षटकात षटकार खेचून भारताला विजयापर्यंत नेले. देशातील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर येऊन आनंद व्यक्त करू लागले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघादरम्यान सुरू असलेल्या सामन्याचा आनंद घेतला.

अखेर ‘अपेक्स आणि सियान’ ट्विन टॉवर्स जमीनदोस्त

हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. त्यावर शरद पवार यांनी हात वर करून आनंद साजरा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार आपल्या नातवंडांसोबत टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

एलपीजी-सीएनजीच्या किंमती बदलणार! वाचा सविस्तर…

पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला.

आरएसएसच्या विविध संघटनांची समन्वय बैठक

भारताकडून विराट कोहलीने 35 धावा, रवींद्र जडेजाने 29 चेंडूत 35 धावा आणि हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने तीन आणि नसीम शाहने दोन गडी बाद केले. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकांत ३२ धावांची गरज होती आणि भारतीय फलंदाजांनी दोन चेंडू राखून लक्ष्य गाठले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.