Take a fresh look at your lifestyle.

भारताची ‘गोल्डन हॅटट्रिक’; भारतीय कुस्तीपटूने केला पाकिस्तानच्या मुहम्मदचा पराभव

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

Wrestling in Commonwealth 2022 : भारतीय कुस्तीपटूंनी आणखी एक पदक मिळवले. विशेष म्हणजे भारताने सलग तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय कुस्तीपटू नवीनने 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने मुहम्मदचा 9-0 अशा फरकाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’; पहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई

भारताचं कुस्तीतील दहावं पदक

भारतीय कुस्तीपटू राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचा अक्षरश: पाऊस पाडत आहेत. अंशूने रौप्य, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक पटकावल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दिव्या काकरनने कांस्यपदक जिंकले. मोहित ग्रेवालने कांस्यपदक जिंकल्यानंतर पूजानेही कांस्यपदक जिंकले, त्यानंतर नवीनने रवी दहिया, विनेश फोगटसह सुवर्णपदक जिंकले.

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने रचला इतिहास; गोल्ड मेडल जिंकत नवा विक्रम केला नावावर

पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला सुुवर्णपदक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारतीय खेळाडू अक्षरशः पदकांचा वर्षाव करत आहेत. कुस्तीमध्ये तीन सुवर्णपदके जिंकल्यानंतर भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भावना पटेल हिने आणखी एक सुवर्णपदक जिंकले आहे. तिने पॅरा टेबल टेनिस महिला एकेरी (वर्ग 3-5) मध्ये पदक जिंकले आहे. यासह भारताच्या सोनलबेन पटेलने पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.