Take a fresh look at your lifestyle.

भारताची ताकद वाढणार! नौदलाच्या ताफ्यात ‘INS विक्रांत’

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आजपासून भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत आज भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. ही संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेनेला ती सुपूर्द करतील. आयएनएस विक्रांतमध्ये लढाऊ विमाने, शस्त्रे वाहून नेण्याचे आणि पुनर्प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान आहे. यात एक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, एक पूल, एक स्वयंपाकघर आणि महिलांसाठी एक खास केबिन आहे.

ज्येष्ठ, दिव्यांगाना तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा; नितीन गडकरी यांची घोषणा

आयएनएस विक्रांतची रचना समुद्रावर तरंगणाऱ्या शहराप्रमाणे करण्यात आली आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरेल. नौदलाच्या लढाऊ ताफ्यात विक्रांतचा समावेश केल्याने हिंदी महासागर आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता वाढेल, असा विश्वास भारतीय नौदलाच्या उच्च अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विक्रांतच्या फ्लाइट डेकचे क्षेत्रफळ 12 हजार 500 चौरस मीटर आहे. यात एक लहान धावपट्टी आणि स्काय-जंपने सुसज्ज असलेली लांब धावपट्टी आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी अनुदानापासून वंचित; शिवसंग्रामचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

INS विक्रांतमध्ये मोठ्या प्रमाणात स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री आहे. देशातील प्रमुख औद्योगिक घराण्यांसह 100 हून अधिक एमएसएमई या सामग्रीच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत. 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद आणि 45,000 टन क्षमतेची ही युद्धनौका तयार करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या युद्धनौकेचा नौदलात समावेश झाल्यामुळे भारताची सागरी सुरक्षा आणखी मजबूत होईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.