Take a fresh look at your lifestyle.

भारतातील सर्वाधिक देणगीदारांची यादी जाहीर; ‘हे’ उद्योगपती अव्वल क्रमांकावर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘एडलगिव हुरुन इंडिया फिलैन्थ्रॉपी’ यांनी नुकतीच भारतातील सर्वात अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांची यादी जाहीर केली असून यानुसार सदर संस्थेने एक अहवाल जारी केला आहे. अहवालात देणगीदारांची यादी दिली गेली असून यामध्ये एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर यांनी सर्वाधिक देणगी देणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. सदर यादीमध्ये अब्जाधीश व्यक्तींचा समावेश असून ते प्रति दिवसाला तसेच प्रति वर्षाला किती देणगी देतात याची माहिती नमूद केली गेली आहे.

जातपंचायतींवर सरकारची बंदी; आंतरजातीय विवाहास राज्यात संरक्षण मिळणार

सर्वात अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांच्या यादीनुसार प्रथम स्थानी शिव नाडर असून द्वितीय क्रमांकावर विप्रोच्या अझीम प्रेमजी यांचा क्रम लागतो. त्यानंतर तिसऱ्या स्थानी मुकेश अंबानी हे असून चौथ्या स्थानी आदित्य बिर्ला हे आहे. एचसीएल चे शिव नाडर हे प्रति दिवसाला ३.१८ कोटी इतकी देणगी देतात यानुसार वर्ष २०२१-२२ या दरम्यान त्यांनी १,१६१ कोटी रुपये देणगी म्हणून दिले आहे. तर अजीम प्रेमजी हे दिवसाला १. ३२ कोटी इतकी देणगी देतात यानुसार त्यांनी मागील वर्षी पासून आतापर्यंत ४८४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

धक्कादायक! लंपी रोगाच्या उद्रेकाने आतापर्यंत राज्यात सात हजार पशुधन दगावले

मुकेश अंबानी यांनी एका वर्षात ४११ कोटी तर आदित्य बिर्ला यांनी २४२ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. इथे विशेष बाब म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी हे देणगीदारांच्या यादीत सातव्या क्रमवार असून त्यांनी वर्षभरात १९० कोटी रुपयाची देणगी दिली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.