Take a fresh look at your lifestyle.

नितेश राणे ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री बनणार असल्याचे संकेत !

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील वाद नवा नाही. त्यानुसार केसरकर यांनी काल राणेंवर आरोपही केले होते. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी राणेंचे नाव पुढे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

केसरकरांच्या टिकेला नेहमीच प्रत्युत्तर देणाऱ्या नितेश राणे यांनीही हिंदुत्वासाठी ते सहन करू, असे उत्तर दिले. या दोघांमध्ये हा समजूतदारपणा आला कसा? याचा शोध अनेकांना लागत नव्हता. तो सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागलाय.

सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; मंत्रिमंडळ विस्तारही लांबणार?

नितेश राणे आणि दीपक केसरकर हे दोघेही आगामी काळात एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता व मतदारांना आश्चर्य वाटण्याची गरज नाही. आता जिल्ह्यात दहशत राहणार नाही. एकंदरीत यामुळे आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याची चर्चा आता जिल्ह्यातील जनसामान्यात आहे.

दरम्यान, नितेश राणे आणि केसरकर हे दोघेही येत्या काळात एकाच व्यासपीठावर दिसणार असून जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांना आश्चर्य वाटायला नको. आता जिल्ह्यात दहशतवाद राहणार नाही आणि त्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.