Take a fresh look at your lifestyle.

उद्योगविश्व : नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायिकतेकडे तरुणाईचा अधिक कल; कोरोना काळानंतर अर्थार्जनाचे पर्याय बदलले

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनानंतर जागतिक स्तरावर अर्थचक्र बदलत असून दिवसागणिक जितक्या प्रमाणात नवे स्टार्टअप उद्योग उभारले जात आहे, त्याच तुलनेत भारतासारख्या देशात तरुणाई मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतंत्र व्यवसाय उभारणीवर अधिक भर देताना दिसून येत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा दिवसागणिक होत असलेला विस्तार तसेच या क्षेत्रातून स्वतंत्रपणे कार्य करताना मिळणारे चांगले अर्थार्जनाचे पर्याय होय.

आरोग्य सेवा आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी तुकाराम मुंढे रुजू

सध्या अनेक देशातील अर्थव्यवस्था रुळावर येताना दिसत आहे, तसेच कोरोनाच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व अधिक स्पष्ट झाल्याने यातून देखील रोजगार संकल्पना बदलल्या आहे. चांगला पगार देत असून देखील एकतर काही कंपन्या नवीन स्टार्टअप आहेत किंवा छोट्या असल्याने त्यांच्या अपेक्षांमध्ये खरे उतरण्यासाठी नोकरदारांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याने, यामुळे देखील नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय बरा, असे तरुणाईचे धोरण सध्या बघायला मिळत आहे.

कर्ज महागले अन् शेअर बाजारात तेजी

विदेशातून भारतीयांना स्वतंत्रपणे घरबसल्या काम देण्याचे प्रमाण वाढले आहे याअंतर्गत वैयक्तिक पातळीवर प्रकल्प घेत चांगली मिळकत होत असल्याने नोकरीपेक्षा स्वतंत्र कार्याकडे अधिक तरुणांचा कल वाढतोय. एका निष्कर्षांनुसार अनेक वर्षे एकाच कंपनीत कार्य करणारे सहकारी एकत्र येत नवीन स्टार्टअप सुरु करत यातून देखील चांगले अर्थार्जन करत आहे. यामुळे कंपनीच्या बंधनाखाली न राहता स्वतःच चालक व मालक या तत्वावर अर्थार्जन करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मुख्यतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अशा कल्पनांना अधिक वाव व प्रत्यक्षपणे यश मिळताना दिसत आहे.

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवे ‘CDS’ म्हणून नियुक्ती

वर्क फ्रॉम होम न देणे, अपेक्षांची पूर्तता करताना होणारी लगबग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विपुल पर्याय, स्वतंत्रपणे स्टार्टअपला मिळणारे यश इत्यादी कारणांनी आजची तरुणाई नोकरीला रामराम ठोकत व्यावसायिकता निवडत आहे. प्राप्त आकडेवारीनुसार भारतातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विप्रोमधून ५४ हजार ३५८, टीसीएस मधून ९२ हजार ६१८ तर इन्फोसिस मधून ५८ हजार ६३२ नोकरदारांनी नोकऱ्या सोडल्या आहे. यापैकी बरेचसे लोक सध्या स्वतंत्र व्यवसाय उभारून चांगली कमाई करत आहे.

ट्विटरकरांसाठी गुड न्यूज! आता ट्विट असं एडिट करता येणार

या सर्व बाबींची चिंता मोठ्या कंपन्यांना आहे म्हणून पर्याय म्हणून पगाराचे पॅकेज वाढ, अतिरिक्त सेवा सुविधा इत्यादी प्रलोभने देखील कंपन्यांकडून त्यांना देण्यात येते, परंतु तरुणाईला नोकरीपेक्षा उद्योजकता सरस वाटत असल्याने झुकते माप स्वतंत्र व्यवसाय निवडीला बघायला मिळत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.