Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी! आता थेट मुलाखतीद्वारे मिळणार बँकेत मोठ्या पगाराची नोकरी! आताच करा अर्ज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या अनेक तरुण नोकरीच्या शोईधात आहेत. स्पर्धा परीक्षा तसेच बँकेशी संबंधित परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बँकिंग कार्मिक चयन संस्थान इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 21 & 22 एप्रिल 2022 असणार आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer)

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B. Tech/ MCA/M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BSc-IT, BCA, BSc- Computer Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) – .61,818/- रुपये प्रतिमहिना

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) – .45,879/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. डब्ल्यू ई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101.

JOB ALERT: राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy

मुलाखतीची तारीख – 21 & 22 एप्रिल 2022

Leave A Reply

Your email address will not be published.