Take a fresh look at your lifestyle.

रशियावर ओढवली मोठी नामुष्की; भारताने घेतली ही स्पष्ट भूमिका

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

रशिया -युक्रेन आणि रशिया या दोन राष्ट्रांमधील युद्ध महिनाभरानंतरही सुरूच आहे. एवढा बलाढ्य देश असताना सुद्धा अजून पर्यंत रशियाला युक्रेनसारख्या देशाला नामवंत आलं नाही. युक्रेनकडून रशियाला खूप चांगला प्रतिकार होत आहे. यामुळे रशियाच्या अडचणी वाढत असून रशियाला राजनैतिक स्तरावरही धक्के बसत आहेत. नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाने मांडलेला ठराव फेटाळला गेला. ज्यामुळे रशियावर मोठी नामुष्की ओढवली.

महिनाअखेर बँका सलग चार दिवस बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी कामे आधीच करुन घ्या

दरम्यान, युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या मानवी गरजांच्या टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी रशियाने हा ठराव मांडला होता. सीरिया , द. कोरिया व बेलारूस या देशांनी या ठरावास सहमती देखील दर्शवली होती. मात्र त्यामध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाचा उल्लेख नसल्याने बहुतांश सदस्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. रशियाचा हा ठराव मंजूर होण्यासाठी नऊ देशांनी त्याच्या बाजूने मतदान करणे गरजेचे होते. मात्र, केवळ चीनने या ठरावाच्या बाजूने मतदान केले.

आ. देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अखेर हकालपट्टी! राजू शेट्टी यांची घोषणा

विशेष बाब म्हणजे भारतासह सुरक्षा परिषदेतील उर्वरित तेरा देशांनी या ठरावावरील मतदानापासून दूर राहणे पसंत केले. थोडक्यात भारताने देखील तटस्थ भूमिका घेतली. यापूर्वी युक्रेनच्या बाजूने मांडल्या गेलेल्या ठरावावर तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारताने रशियाने मांडलेल्या या ठरावातही मतदानात भाग न घेऊन आपले धोरण कायम ठेवले. त्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला नाही. या ठरावाच्या आडून रशिया आपले क्रौर्य व आक्रमक धोरण लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका अमेरिकेच्या प्रतिनिधी लिंडा थॉमस यांनी केली. रशिया आक्रमक व हल्लेखोर आहे. युक्रेनमधील मानवी गरजांच्या टंचाईचे वर्णन करताना स्वत: केलेल्या आक्रमणाचा मात्र त्यांनी उल्लेख केलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा

रशियाकडून युद्धगुन्हे

व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाने युक्रेनमध्ये युद्धगुन्हे केल्याचा आरोप अमेरिकेने केला. रशियाच्या फौजांनी युक्रेन मधील नागरी वस्त्यांनादेखील लक्ष्य केले, यामध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. तसेच, रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये मोठा संहार होऊन त्यांची घडी विस्कटली. सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या या माहितीच्या आधारे रशियाने युद्धगुन्हे केल्याचे स्पष्ट होत आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारीस युक्रेनवर आक्रमण केले होते.

आता ‘या’ पक्षाला मोठा धक्का; सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ब्रिटनकडून युक्रेनला क्षेपणास्त्रे

ब्रिटनकडून युक्रेनला आणखी हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ब्रसेल्सच्या दौऱ्यावर जाणार असून ते नाटोसह अन्य नेत्यांशी चर्चा करणार आहेत. अन्य देशांनीही युक्रेनला जास्तीत जास्त शस्त्रपुरवठा करावा, असे आवाहन जॉन्सन यांनी केले आहे.

अधिकाऱ्यांची हकालपट्टी

मॉस्कोतील अमेरिकी दूतावासात कार्यरत असणाऱ्या अनेक अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांची रशियाने हकालपट्टी केली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या रशियन अधिकाऱ्यांनी अमेरिकेने नुकतीच हकालपट्टी केली होती. त्यानंतर रशियाने याप्रकारे प्रत्युत्तर दिले.

बैलगाडा शर्यत जिंकली पण मृत्यूने मात्र हरवलं, ‘असा’ झाला बैलगाडा मालकाचा मृत्यू!

Leave A Reply

Your email address will not be published.