Take a fresh look at your lifestyle.

गुंतवा ‘या’ मुदत ठेवीत पैसा, दोन वर्षांत लक्षणीय परतावा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या महागाई दर ६.७१ टक्के सुरु आहे. त्यापेक्षा हा आरडी दर अधिक आहे. अश्यातच दोन वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेवर जन स्मॉल फायनान्स बँकेने ८.०५ टक्के व्याजदर दिला आहे. व्याजदर निश्चित असल्याने आवर्ती ठेव योजनेत दर महा ठराविक रक्कम गुंतवल्यास मोठा परतावा मिळतो. ही रक्कम अचानक आलेल्या आर्थिक संकटात मदत करते. ज्या पध्दतीने म्युच्युअल फंडात SIP मार्फत गुंतवणूक केली जाते,तशीच इथेही गुंतवणूक केली जाते .

किती अवधीसाठी गुंतवणूक

६ महिन्यांपासून ते १० वर्षांपर्यंत आरडी खाते चालविल्या जाते. गुंतवणूकदारांना २ वर्षांत ८ टक्के व्याजदराने परतावा मिळेल अश्या तीनही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत.

मोठी बातमी : शिर्डी साई संस्थानचे ‘विश्वस्त मंडळ’ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

जन स्माल फायनान्स बँक

१५ जून २०२२ पासून या बँकेच्या आवर्ती ठेव योजनेचा व्याजदर लागू आहेत. या योजनेचा कालावधी कमीत कमी ६ महिने तर अधिकत्तम १२० महिने आहे. या आवर्ती ठेव योजनेत अगदी १०० रुपयांपासून आरडी खाते उघडता येते. जेष्ठ नागरिकांसाठी ही बँक ८ .०५ टक्के व्याज देते. मात्र , आरडीतून कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रक्कम काढल्यास ०.५ टक्क्यांचा दंड द्यावा लागतो.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

१२ ऑगस्ट २०२२ पासून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदर लागू आहेत. गुंतवणुकीसाठीचा कालावधी कमीत कमी ६ महिने तर अधिकत्तम १२० महिने आहे. २१ महिन्यांपेक्षा अधिक आणि २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या आरडी स्कीमवर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याजदर देण्यात येणार आहेत. जर मुदतपूर्व आरडी स्कीम बंद केल्यास गुंतवणूकदाराला १ टक्के व्याजदर कमी मिळेल.

‘या’ अभिनेत्रीच्या अडचणी कमी होईनात; पुन्हा बजावले समन्स

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक

१ एप्रिल, २०२२ पासून नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचा नवीन आरडी दर लागू झाला आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना २ वर्षांच्या आरडीवर ८ टक्के व्याज देते. हे व्याजदर महागाई दरापेक्षा अधिक आहे. ही बँक ३ महिन्यांच्या आरडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ४.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज देत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.