Take a fresh look at your lifestyle.

अखेर iPhone 14 लॉन्च; जाणून घ्या फिचर्स, डिझाईन आणि किंमत…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

Apple iPhone 14 Launch : भारतीय आयफोन वापरकर्ते आणि Apple चाहत्यांसाठी ७ सप्टेंबरची रात्र खूप खास होती. प्रसिद्ध टेक कंपनी Apple ने अधिकृतपणे आपली नवीन आणि प्रगत iPhone 14 सिरीज लॉन्च केली आहे. नवीन iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max लाँच करण्यात आले आहेत, जे उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अतुलनीय वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. Apple चा इव्हेंट कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला आहे.

राज्यातील 1166 ग्रामपंचायत निवडणुका जाहीर; सरपंचपदाची थेट निवडणूक

Apple चे म्हणणे आहे की, iPhone 14 आणि iPhone 14 plus आयफोनमध्ये सर्वोत्तम बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन A15 बायोनिक चिपवर चालतात. Apple ने आयफोनमधील चिपचा पुनर्वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. Apple चा दावा आहे की, आयफोन 14 हा सर्वात फास्ट फोन आहे. Apple iPhone 14 पाच रंगात लॉन्च केला आहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड यांचा समावेश आहे. यावेळी Apple ने iPhone 14 मध्ये SIM कार्ड स्लॉट टाकला नाही. पण कंपनीने हे फक्त अमेरिकेत लॉन्च केलेल्या फोनसाठी केले आहे. भारतात सिम कार्ड स्लॉट दिला जाऊ शकतो.

“बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा कोण चालवत आहे, याला जास्त महत्त्व”- जयंत पाटील

स्पेसिफिकेशन

  • iPhone 14 स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर iPhone 14 plus स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे.
  • दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध आहे.
  • iPhone 14 – फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा – 12 MP चा आहे.
  • नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबत उपलब्ध आहे.
  • कार क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध मिळणार.
  • Appleने यात मोठा आणि फास्ट सेन्सर असल्याचा दावा केला आहे. या फोनबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, फोनच्या लो-लाईट कॅप्चरमध्ये देखील 49 टक्के सुधारणा करण्यात आली आहे. यातील मागील कॅमेरा अल्ट्रा-वाइड आहे. फ्रंट-कॅमेरा 38 टक्के लो-लाईटमध्ये चांगलं काम करतो, असं कंपनीचं म्हणणं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.