Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 – विराट कोहलीच्या टिप्स कामी, चेन्नई टीमच्या पुणेकरानं केले 10 बॉलमध्ये 50 रन; व्हिडीओ व्हायरल

मागील सिझनमध्ये सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतुराजनं पहिल्या पाच मॅचमध्ये फक्त 35 रन केले होते. चेन्नईच्या खराब कामगिरीत ऋतुराजच्या अपयशाचाही मोठा वाटा होता.

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मध्ये आणखी एक पराभव झाला. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) चेन्नईचा 3 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईचा या स्पर्धेतील पाचवा पराभव आहे. या पराभवातही चेन्नईच्या फॅन्ससाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. गेल्या पाच सामन्यांपासून त्यांना प्रतीक्षा असेलेली ऋतुराज गायकवाडची (Rituraj Gaikwad) दमदार बॅटींग अखेर गुजरात विरूद्ध दिसली. ऋतुराजनं गुजरात विरूद्ध आक्रमक अर्धशतक झळकावले.

मुसळधार पावसामुळे 400 लोकांचा मृत्यू; शोध आणि बचाव कार्य वेगात

मागील सिझनमध्ये सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतुराजनं पहिल्या पाच मॅचमध्ये फक्त 35 रन केले होते. चेन्नईच्या खराब कामगिरीत ऋतुराजच्या अपयशाचाही मोठा वाटा होता. गुजरात विरूद्ध ऋतुराजनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक झळकावलं.

https://www.instagram.com/tv/CcSBG_5lrGx/?utm_source=ig_web_copy_link

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खराब झाली. रॉबिन उथप्पा आणि मोईन अली झटपट आऊट झाले. त्यानंतर ऋतुराजनं अंबती रायुडूसोबत चेन्नईची इनिंग सावरली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 रनची भागिदारी केली. ऋतुराजनं 5 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 73 रन केले. याचाच अर्थ त्यानं फक्त 10 बॉलमध्ये 50 रन काढले.

IMPORTANT: तुमचं Pan Card वापरून इतर कोणी loan घेतलंय का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

ऋतुराजच्या या यशात टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) दिलेल्या टिप्सचा मोठा वाटा आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्धच्या मॅचनंतर ऋतुराजनं विराटशी बराच वेळ चर्चा केली होती. या चर्चेत विराटनं दिलेल्या टिप्स त्याच्या उपयोगी पडल्या, असं मानलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.