Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video पाहाच

ओटीटी न्यूज नेटवर्क

IPL 2022 : गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर मेगा फायनलमध्ये आमनेसामने आले. सुमारे १ लाख ३० हजार लोक बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. बीसीसीआयने या मेगा इव्हेंटचा समारोप सोहळा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.

एआर रहमान (A. R. Rahman) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. रणवीर सिंगने काही अप्रतिम डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तर एआर रहमान यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रहमान यांच्या गाण्याचा एक लाखांहून अधिक लोकांनी आनंद लुटला. ‘वंदे मातरम’ (Vande Mataram )गाण्यावर जमाव डोलत होता. जवळपास एक लाख लोकांनी ‘वंदे मातरम्’ हे गाणे एकत्र गायले जे भारतीय चाहत्यांसाठी भावनिक आणि नेत्रदीपक दृश्य होते. अशा पद्धतीने ‘वंदे मातरम्’ गाण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नसावी.

‘असा’ रंगला सामना
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने सर्वात जास्त तीन गडी बाद केले. त्यामध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायर या स्फोटक फलंदाजांचा समावेश होता. साई किशोरने दोन तर शामी, यश दयाल आणि राशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत आपल्या कर्णधाराला पुरेपुर मदत केली होती. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.

Comments are closed.