Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल 2022 – टायटन्सचा विजयी शुभारंभ, गुजरातच्या रंगतदार विजयाची चार प्रमुख कारणं

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

आयपीएल 2022 – बहुचर्चित असलेल्या आयपीएल 2022 च्या पंधराव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यात मध्ये सोमवारी दोन नव्या टीममध्ये झाली. दरम्यान, सोमवारच्या या मॅचसाठी सर्वच जण उत्सुक होते. कारण आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील ही चौथी लढत गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स अशी झाली. विशेष बाब म्हणजे या दोन्ही टीम पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळल्या. (Hardik Pandya)हार्दिक पांड्या सध्या गुजरातच्या कॅप्टनशिपची जबाबदारी सांभाळत असून तर लखनऊचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आहे.

सध्या कॅप्टन हार्दिकसह शुभमन गिल (Shubman Gill) आणि राशिद खान (Rashid Khan) या खेळाडूंवर गुजरात टायटन्स मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. गुजरातनं या तीघांनाही आयपीएल ऑक्शनपूर्वी ड्राफ्ट केलं होतं.

दरम्यान, काळ झालेल्या या नवख्या टीमचा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. ज्यात राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) चौकार ठोकून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लखनौची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने चांगली फलंदाजी करुन संघाचा डाव सावरत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

त्यानंतर गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मधल्याषटकात लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र,शेवटच्या शतकापर्यंत कडवी झुंज देत अखेरीस गुजरात टायटन्सने हा सामना राखला. दरम्यान, या सामन्यातील चढाओढ पाहता हा सामना शेवेच्या शतकापर्यंत अधिकच रंगतदार होत गेला. दरम्यान, गुजरात टायटन्सला हा सामना कशामुळे जिंकता आला? त्यांच्या विजयाची काय कारण आहेत, ते जाणून घेऊया.

मोहम्मद शमीनं आज भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. नव्या चेंडूसह त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. शमीच्या गोलंदाजीमुळं आघाडीच्या फलंदाजांना रोखण्यात गुजरातला यश आलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचा संघ बॅकफूटवर गेला. लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलला तर मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर विकेटकीपर करवी झेलबाद केले. राहुलने डिफेंस करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. त्यानंतर त्याने क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे अशा तीन विकेट काढल्या.

दोन विकेट लवकर गेल्यानंतर हार्दिक पंड्याने मॅथ्यू वेडसोबत मिळून डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र, हार्दिक पंड्या (33) कुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

दीपक हुड्डा, रवी बिष्णोई आणि कुणाल पंड्याची फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरली. डेविड मिलरने देखील दीपक हुड्डाच्या गोलंदाजीवर बेधडक फटकेबाजी करुन त्याच्या एका षटकात 22 धावा वसूल केल्या. मोक्याच्या क्षणी मिलर बाद झाला. पण त्यावेळी गुजरात सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता. मिलरने 21 चेंडूत 30 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार यांचा समावेश होता.
राहुल तेवतिया गुजरातच्या विजयाचं मुख्य कारण आहे. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 24 चेंडूत नाबाद 40 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. डेविड मिलरसोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी करुन सामना गुजरातच्या बाजूने फिरवला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.