Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : वादळी शतकासह Jos Buttler ने घडवला इतिहास, दिग्गजांनाही दिली धोबीपछाड

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – IPL 2022 आयपीएल 2022 च्या (IPL 2022) दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये जॉस बटलरची (Jos Buttler) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या (Rajasthan Royals vs RCB) या सामन्यात बटलरने वादळी शतक केलं, त्याने 60 बॉलमध्ये नाबाद 106 रनची खेळी केली, यामध्ये 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं बटलरचं हे चौथं शतक आहे. बटलरच्या या शतकामुळे राजस्थान आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे, तर आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

तुमचे पैसे चुकीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झालेत का? ‘ही’ सोपी प्रक्रिया करून परत मिळवा पैसे

आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये शतक करणारा बटलर सहावा खेळाडू आहे. याआधी सेहवाग, वॉटसन, ऋद्धीमान साहा, मुरली विजय, रजत पाटीदार यांनी प्ले-ऑफमध्ये शतकं केली होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये बटलर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 6 शतकं क्रिस गेलच्या नावावर आहेत. तर विराट कोहली आणि बटलरने प्रत्येकी 5-5 शतकं केली आहेत, तसंच आयपीएलमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक 4 शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) विक्रमाचीही बटलरने बरोबरी केली आहे. विराटनेही 2016 आयपीएलमध्ये 4 शतकं केली होती.

Ola E-Scooter ला टक्कर देणाऱ्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; सिंगल चार्जमध्ये ११५ किमी रेंज, अवघ्या ४९९ रुपयांत करा बुकिंग

बटलरने गाठला 800 चा आकडा

जॉस बटलरने आयपीएलच्या मोसमात 800 रनचा टप्पा पार केला आहे. 16 सामन्यांमध्ये त्याने 150.64 च्या स्ट्राईक रेटने आणि 58.43 च्या सरासरीने 818 रन केले आहेत, यात 4 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. बटलरने या मोसमात 78 फोर आणि 44 सिक्स ठोकल्या.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे विराटने 2016 च्या आयपीएलमध्ये 973 रन केले होते. तर डेव्हिड वॉर्नर (David Warner) या यादीत 848 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरचा विक्रम मोडायला बटलरला आणखी 31 रनची तर विराटचा विक्रम मोडायला 156 रनची गरज आहे, पण विराटचा विक्रम मोडणं बटलरला कठीण आहे. 29 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल फायनल होणार आहे, या सामन्यात बटलर पुन्हा एकदा मैदानात उतरेल.

PM Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेविषयी मोठी बातमी! मिळणार तब्बल ‘इतकी’ रक्कम

Comments are closed.