Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : बुमराहच्या भेदक बाऊन्सरवर पृथ्वी शॉ मैदानातच पडला! पाहा VIDEO

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – IPL 2022 आयपीएल 2022 चं (IPL 2022) हे सत्र आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) तीन टीमचा प्रवेश झाला आहे, तर चौथ्या टीमसाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि आरसीबी (RCB) यांच्यात रेस आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचतील, पण मुंबईने ही मॅच जिंकली तर मात्र आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरेल.

जितका चांगला Cibil स्कोअर तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त ; असा चेक करा तुमचा सिबिल स्कोअर

या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईच्या बॉलरनी सुरूवातीपासूनच दिल्लीला धक्के दिले. 50 रनवरच दिल्लीने त्यांच्या पहिल्या 4 विकेट गमावल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर 5 रनवर तर मिचेल मार्श पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर दिल्लीने पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) रुपात तिसरी विकेट गमावली.

जून २०२२ मध्ये तब्बल इतके दिवस बँका राहणार बंद! जाणून घ्या तारखा

जसप्रीत बुमराहने टाकलेला भेदक बाऊन्सर पृथ्वी शॉला झेपलाच नाही. हा बाऊन्सर खेळण्याच्या नादात पृथ्वी शॉ मैदानात पडला, एवढच नाही तर तो विकेटही गमावून बसला. या सामन्यातून पृथ्वी शॉने दिल्लीच्या टीममध्ये पुनरागमन केलं होतं. टायफॉईड झाल्यामुळे शॉ रुग्णालयात दाखल होता, पण फिट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा टीममध्ये आला. 23 बॉलमध्ये 24 रन करून शॉ पॅव्हेलियनमध्ये परतला.

10वी आणि 12वी उत्तीर्णांनो लक्ष द्या! BSF मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

आयपीएलच्या या मोसमात दिल्लीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम होती. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने या मोसमात पहिल्या 8 मॅच गमावल्या होत्या. मुंबईने या सिझनमध्ये 13 पैकी 10 मॅच गमावल्या असून फक्त 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.