Take a fresh look at your lifestyle.

पराभवानंतरही राजस्थान पहिल्या स्थानी, आयपीएल मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई :मुंबई – क्रिकेट आयपीएल २०२२ स्पर्धा सध्या जोरदार चर्चेत आहे. काल म्हणजेच मंगळवारी सध्या सुरु असलेल्या पंधराव्या सीझनचा तेरावा सामना झाला. अतिशय चुरशीची हि मॅच झाली. यात RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं चित्र होतं. मात्र, दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद या जोडीने सगळे अंदाज खोटे ठरवत कालचा सामना पराभवाच्या सावलीतून खेचून आणला. या जोडीच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले आणि संजू सॅमसनच्या राजस्थान संघावर आरसीबीने ‘रॉयल’ विजय मिळवला. विशेष म्हणजे आरसीबीच्या विराट कोहलीकडून प्रेक्षकांना खास अपेक्षा होत्या. मात्र, तो या सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकला नाही. मंगळवारचा हा आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना म्हणजे मंगळवारी प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरला. आयपीएलच्या इतिहासातील एक अविस्मरणीय रंगतदार सामना मंगळवारी प्रेक्षकांना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. पण दिनेश कार्तिकने आणि अहमदने सामन्याचं चित्र पालटलं.

टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं हेतं. कालच्या RR vs RCB सामन्यानंतर पॉईंट्सच्या टेबलमध्ये बदल दिसून आला. विशेष म्हणजे राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी कायम आहे. तर RCB सहाव्या क्रमांकावर गेला असून त्याला चार पॉईंट्स मिळाले आहेत.

दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

RCB सहाव्या स्थानी

रविचंद्रन अश्विन टाकत असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावत 21 धावा चोपल्या. तिथूनच सामन्याच चित्र बदललं. राजस्थानने निर्धारीत 20 षटकात 169 धावा फटकावल्या. हे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चार विकेट आणि पाच चेंडू राखून पार केलं. RCB ने हा सामना जिंकला तो, दिनेश कार्तिक नाबाद (44) आणि शाहबाज अहमद (45) यांच्या फलंदाजीमुळे. त्यामुळे RCB पॉईंट्सच्या टेबलमध्ये टेबलमध्ये सहाव्या स्थानी आला आहे.

आयपीएल 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट रनआउट; व्हिडीओ व्हायरल

राजस्थान पराभवानंतरही अव्वल

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय मिळवला. असं असलं तरी राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर बँगलोर संघाने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

शेवटच्या चेंडूची चर्चा

सामन्यात बटलर आणि देवदत्तच्या जोडीची चर्चा राहिली. त्यामुळे ही जोडी फोडणं आवश्यक होतं. हर्षलने देवदत्त पडिक्कलला शेवटच्या चेंडूवर फसवलं. यात इंटरेस्टिग भाग म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त चेंडूवर देवदत्त पडिक्कल आऊट झाला. देवदत्त पडिक्कलला हर्षलने स्लोअर बाऊन्सर टाकला. ऑन फिल्ड अंपायरने तो चेंडू वाईड ठरवला. हा निर्णय हर्षल पटेलला पटला नाही. त्याच्या चेहऱ्यावर संतप्त भाव होते. अखेर त्याने टाकलेला षटकातील शेवटचा चेंडू फटकावताना देवदत्तने मारलेला फटका विराटने झेलला. विराटने ही जबरदस्त कॅच घेतली.

दूध उत्पादकांनो लक्ष द्या! दुधाचे भाव पुन्हा वाढणार; भाववाढीचं महत्वाचं कारण समोर

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.