Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : ‘सिक्रेट’ गुन्ह्याबाबत पृथ्वी शॉला शिक्षा, आयपीएलने दिला जबर धक्का

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला आयपीएल नियमांचं उल्लंघन केलं म्हणून मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जाएंट्स (DC vs LSG) यांच्यात झाला, या सामन्यात दिल्लीला पराभवाचा धक्का बसला, पृथ्वी शॉने 7 बॉलमध्ये 5 रन केले. मॅचनंतर आयपीएलने (IPL 2022) दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शॉवर आयपीएल आचार संहिता अनुच्छेद 2.2 नुसार लेव्हल 1 च्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं. शॉनेही त्याची चूक स्वीकारली आहे.

खेळाडूने विरोधी खेळाडू किंवा अंपायरविरुद्ध मैदानात इशारा केल्यास किंवा आक्षेपार्ह शब्द लेव्हल 1 नुसार कारवाई केली जाते, पण शॉने नेमकं काय केलं, याचं स्पष्टीकरण आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेलं नाही.

आयपीएल 2022 च्या 45 व्या सामन्यात लखनऊने दिल्लीचा 6 रनने पराभव केला. लखनऊने दिल्लीला 196 रनचं आव्हान दिलं होतं, पण याचा पाठलाग करताना दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 189 रनच करता आले. ऋषभ पंतने सर्वाधिक 44 रन केले, तर मिचेल मार्श 37 रनवर आऊट झाला.

लखनऊकडून मोहसीन खानने शानदार बॉलिंग केली, त्याने 4 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 4 विकेट घेतल्या. मोहसीनने वॉर्नर, पंत, पॉवेल आणि शार्दुलला आऊट केलं. मोहसीनच्या या धमाकेदार कामगिरीमुळे लखनऊला विजय मिळवण्यात यश आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.