Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : धोनीचा बुलेट रन आऊट झालेला video पाहिलात का? कोहलीच्या चुकीची शिक्षा मॅक्सवेलला

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – विराट कोहली (Virat Kohli) जगातील सर्वात फिट असलेल्या खेळाडूपैकी एक आहे. फक्त फिल्डिंगच नाही तर रन काढतानाही विराटएवढा जलद धावणारा खेळाडू सापडणं कठीणच आहे, पण आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सीएसकेविरुद्धच्या (CSK vs RCB) सामन्यात विराटने केलेल्या चुकीची शिक्षा ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) भोगावी लागली आहे. विकेट मागे उभ्या असलेल्या एमएस धोनीने (MS Dhoni) क्षणाचाही विलंब न घालवता मॅक्सवेलला रन आऊट केलं.

तरुणांनो लक्ष द्या! शिक्षण घेताना ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची सुवर्णसंधी

विराट कोहलीने मॅक्सवेलला एक रन काढण्यासाठी बोलावलं, त्यामुळे मॅक्सवेलही रनसाठी धावला पण या गडबडीमध्ये मॅक्सवेल रन आऊट झाला. नवव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. कोहली ऑफ साईडला बॉल मारल्यानंतर धावायला लागला, यानंतर रॉबिन उथप्पाने बॉल थ्रो करून धोनीकडे फेकला आणि धोनीने उरलेलं काम करून टाकलं.

मॅक्सवेल जेव्हा आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये जात होता तेव्हा विराटच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही सांगून जात होते. मॅक्सवेलची विकेट घेतल्याचा पश्चाताप विराटच्या चेहऱ्यावर दिसत होता. मॅक्सवेल 3 बॉलमध्ये 3 रन करून आऊट झाला.

विराट कोहली 33 बॉलमध्ये 30 रन करून आऊट झाला, मोईन अलीने त्याला बोल्ड केलं. या सामन्यातत सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.