Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 च्या अर्ध्या मॅच झाल्या, T20 World Cup साठी भारतापुढे 4 चॅलेंज!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – आयपीएल 2022 च्या (IPL 2022) अर्ध्या मॅच आता झाल्या आहेत. आतापर्यंत अनकॅप भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, पण भारताच्या स्टार खेळाडूंच्या पदरी निराशा आली आहे, यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांचा समावेश आहे. या तीन खेळाडूंमुळे फक्त त्यांच्या आयपीएल फ्रॅन्चायजीच नाही तर टीम इंडियाच्या निवड समितीचीही चिंता वाढली असेल, कारण यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे.

तात्काळ जमा करा तुमचं रेशनकार्ड, अन्यथा सरकार करणार कडक कारवाई

अजून टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड झालेली नाही, पण निवड समितीच्या डोक्यात खेळाडूंची नावं ठरलेली आहेत. आयपीएलमधल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे निवड समितीला मात्र पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाची कामगिरी खराब झाली होती. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोर चार प्रमुख आव्हानं दिसत आहेत.

Loan बँकेचं लोन लवकर फेडायचे आहे? ‘ही’ पद्धत येईल कामी; व्याजही वाचेल आणि टेन्शनही नाही

टीम इंडियाच्या दिग्गजांची निराशा

विराटने (Virat Kohli) आयपीएल 2022 मध्ये 8 मॅच खेळून 17 च्या सरासरीने 119 रन तर रोहितने (Rohit Sharma) एवढ्याच मॅचमध्ये 19 च्या सरासरीने 153 रन केल्या आहेत. या दोघांनाही या मोसमात अर्धशतक करता आलेलं नाही. इशान किशनची (Ishan Kishan) कामगिरी या दोघांपेक्षा चांगली झाली असली, तरी पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतकं केल्यानंतर त्याचाही फॉर्म कमालीचा ढासळला आहे. इशानने 108 च्या स्ट्राईक रेटने 199 रन केले आहेत.

शिवसेनेतील नाराजी उघड; ‘त्या’ एका आदेशामुळे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे! राजकारणात खळबळ

विराटच्या फॉर्मने वाढवलं टेन्शन

विराट कोहलीने बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी टीम इंडिया आणि आरसीबीची कॅप्टन्सी सोडली, पण यानंतर विराटच्या बॅटमधून रन येण्याऐवजी त्याचा संघर्ष अजून वाढला. आयपीएल 2022 मध्ये तो लागोपाठ दोन वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. 41 नाबाद आणि 48 रनची खेळी सोडली तर विराटने यंदा 12, 5, 1,12,0 आणि 0 रन केल्या आहेत.

रोहित कॅप्टन्सी आणि बॅटिंगमध्येही फेल

रोहितने सर्वाधिक 5 वेळा मुंबई इंडियन्सना आयपीएल चॅम्पियन बनवलं, पण यंदा मुंबई प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारी पहिली टीम ठरली आहे. मुंबईने या मोसमात लागोपाठ 8 मॅच गमावल्या आहेत, अजूनही ते पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. रोहितने भारताच्या पूर्णवेळ कर्णधारपदाला दणक्यात सुरूवात केली होती. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला टीम इंडियाने व्हाईट वॉश केलं, पण आयपीएलमध्ये रोहितची जादू चालली नाही. बॅटिंगमध्येही रोहित शर्मा संघर्ष करताना दिसत आहे.

PAN-Aadhaar लिंक होत नाहीय? जाणून घ्या कारणं; असं करा ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी लिंक

छाप पाडण्यात बुमराह अपयशी

बुमराहचं (Jasprit Bumrah) नाव आज जगातल्या सर्वोत्तम बॉलरमध्ये घेतलं जातं, पण आयपीएल 2022 मध्ये त्याच्या बॉलिंगमध्ये धार दिसत नाहीये. बुमराहने 8 मॅचमध्ये 30 ओव्हर बॉलिंग केली यात त्याला फक्त 5 विकेट मिळाल्या, यातल्या 3 विकेट तर एकाच मॅचमध्ये आल्या आहे. म्हणजेच उरलेल्या 2 विकेट त्याला 6 मॅचमध्ये मिळाल्या.

सगळ्यात महागडा खेळाडू डोकेदुखी

इशान किशन आयपीएल 2022 मधला सगळ्यात महागडा खेळाडू आहे. मुंबईने त्याला 15.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं, पण त्याला त्याच्या किंमतीला साजेशी खेळी करता आलेली नाही. इशान फास्ट बॉलिंग आणि शॉर्ट बॉलवर संघर्ष करतोय, त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी तो टीममध्ये फिट होणं कठीण आहे, असं सुनिल गावसकर म्हणाले.

Cricket – क्रिकेट विश्व हळहळलं! यॉर्करच्या बादशाहाचा जगाला अलविदा

मिडल ऑर्डरचाही संघर्ष

आयपीएलमध्ये टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतने 37 च्या सरासरीने 188 रन केले असले तरी त्याच्याही बॅटमधून अर्धशतक आलेलं नाही. दुसरीकडे श्रेयस अय्यरलाही चमकदार कामगिरी करता आली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.