Take a fresh look at your lifestyle.

स्वस्तात मस्त! गोवा ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय? IRCTC नं आणलं जबदरदस्त पॅकेज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जर गोवा ट्रीपसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, भारतीय रेल्वेने पर्यटकांना गोवा फिरता यावं यासाठी एक खास पॅकेज आणलं आहे. IRCTC ग्लोरियस गोवा असं या टूर ट्रीप पॅकेजचं नाव असून या पॅकेजमध्ये तुम्ही अगदी कमी किंमतीत गोवा फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

प्रवासादरम्यान मिळतील या सुविधा

रेल्वेच्या या खास पॅकेजमध्ये तुम्ही मनसोक्त गोवा फिरण्याचा आनंद घेऊ शकता. गोवा ट्रीपच्या प्रवासासाठी तुम्हाला  IRCTC च्या ग्लोरियस गोवा टूर पॅकेज अंतर्गत थर्ड एसी आणि स्लीपर क्लासमधून प्रवास करता येईल. इतकच नाही तर या पॅकेजमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, डीनर, तसचं शेअरिंग बेसिसवर हॉटेलवर राहण्याची सुविधा मिळेल.

या ठिकाणांना देता येईल भेट

या ट्रीप पॅकेजची एक विशेष बाब म्हणजे, ट्रीप दरम्यान तुम्हाला Aguada Beach, Candolim Beach, ओल्ड गोवा चर्च, मंगेशी मंदिर, Baga Beach, Dona Paula Beach, Calangute Beach अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देता येईल.

अशी करता येईल बुकिंग

जर तुमचंही गोवा फिरण्याचं मन असेल तर तुम्ही या पॅकेजची ऑनलाईन बुकिंग करू शकता. यासाठी तुम्हाला Glorious Goa पॅकेज Tour IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्ही इतर रिजनल ऑफिसमधून सुद्धा IRCTC ची ही गोवा टूर बुक करू शकता.

ट्रीप पॅकेजचा खर्च किती?

दरम्यान, आता या ट्रीप पॅकेजची किंमत किती? त्यासाठी किती खर्च येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या पॅकेजमध्ये तुम्हाला तब्बल 4 दिवस आणि 3 रात्री गोव्यामध्ये घालवण्याची संधी आहे. तसचं पॅकेजची सुरूवातीची किंमत 9660 रुपये इतकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही कारणास्तव ही टूर एकदा बुकिंग केल्यानंतर कॅन्सल करायची असल्यास तसाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.

कॅन्सेलेशनचा पर्यायही उपलब्ध

टूरच्या 15 दिवस आधी बुकिंग कॅन्सल केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 250 रुपये चार्ज द्यावा लागेल. त्याशिवाय 14 ते 8 दिवस आधी टूर कॅन्सल केल्यास 25 टक्के चार्ज भरावा लागेल. 7 ते 4 दिवस पहिले ग्लोरियस गोवा टूर बुकिंग कॅन्सल केल्यास 50 टक्के चार्ज भरावा लागेल. आणि 4 दिवसांहून कमी दिवस उरलेले असताना बुकिंग रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.