Take a fresh look at your lifestyle.

“शिवसेनेला न्याय मिळाला ही समाधानकारक बाब” – अजित पवार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिंदे गट व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्यावरून वाद रंगला असताना सदर प्रकरण न्यायालयात गेले होते. या प्रकरणी उच्च न्यायालय काय निर्णय देते याची सर्वांना प्रतीक्षा असताना काल उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने न्याय देत शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता शिवसेनेचा शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्धव ठाकरेच शिवतीर्थावर मेळावा घेऊ शकणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दसरा मेळावा : शिंदे गटाला उच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, दसरा मेळाव्याची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंनी केली होती त्यामुळे त्यांच्या पश्चात शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. आज न्यायव्यवस्थेने उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या बाजूने न्याय दिल्याने ही समाधानकारक बाब आहे. ज्यांना एकनाथ शिंदे यांना ऐकायचे आहे त्यांनी बीकेसी ला जावे असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर देखील भाष्य केले.

आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल; UIDAIची माहिती

देशाच्या अर्थमंत्री असल्याने त्या देशात कुठेही जाऊ शकतात त्यामुळे त्यांचे बारामतीत देखील स्वागतच झाले. भाजपला लोकसभेत मोठी आघाडी घ्यायची आहे त्यामुळे त्यांचे प्रयत्न सुरु आहे. असे देखील शेवटी अजित पवार म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.