Take a fresh look at your lifestyle.

OTT Rules 2021: सर्वानाच पाहता येणार नाही Adult Content, केंद्र सरकारने जाहीर केली नवी नियमावली OTT Full Form

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – OTT Full form केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही नवीन नियम आता लागू केले आहेत. इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी (Guidelines for Intermediaries and Digital Media Ethics Code) रूल्स, 2021 च्या अंतर्गत आता OTT प्लॅटफॉर्मसला त्यांचा कंटेट हा कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि कोणत्या वयोगटाचे लोक तो पाहू शकतात याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करावं लागणार आहे. म्हणजेच आता OTT प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेटला आता यापुढे एक classification ratings द्यावं लागणार आहे.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट; वाचा संपूर्ण आठवड्याचं हवामान एका क्लिकवर

long form of OTT नव्या नियमानुसार, आता नेटफ्लिक्स (Netflix), अमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिस्ने हॉटस्टार (Disney Hotstar) सारख्या सगळयाच OTT platforms ला आता एडल्ट कंटेंट दाखवण्यापूर्वी त्याला ‘A’ रेटींग द्यावं लागेल. मनीकंट्रोलने याबात अधिक माहिती दिली आहे. OTT platforms वर बऱ्याच काळापासून सातत्याने अश्लीलता पसरवण्याचा आरोप होत आहे. तसंच इथल्या कंटेट वर कोणाच लक्ष देखील नसतं अशा बऱ्याच युजर्सच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच सरकारने आता हा नवीन कायदा लागू केला आहे. यानुसार आता 18 वर्षांखालील मुले आता अॅडल्ट कंटेंट पाहू शकणार नाहीत.

झटपट पर्सनल लोन हवं आहे का? मग या महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाच

पाहा कंटेट रेटिंगनुसार 6 कॅटेगरी:

1) U कॅटेगरी: या कॅटेगरी मधील कंटेंट कोणीही पाहू शकेल. ही कॅटेगरी सगळ्यांसाठी खुली आहे.

2) U/A कॅटेगरी: या कॅटेगरी मधील कंटेंट सुद्धा सगळे पाहू शकतात पण यात असेही काही दृश्य असू शकतात जी लहान मुलांना पाहण्यासाठी योग्य नाहीत.

याशिवाय मुलांसाठी दोन प्रवर्गही तयार करण्यात आले आहेत, U/A- 7+ आणि U/A 13+

वाह! आता फक्त ५,९९९ रुपयांमध्ये घरी आणा ‘हा’ HD LED TV; जाणून घ्या या बंपर सेलविषयी

3) U/A- 7+ कॅटेगरी: यामधला जो कंटेंट असेल त्यात हिंसेची दृश्य असू शकतात पण सोबतच विनोद आणि कल्पनात्मक कंटेंट असण बंधनकारक आहे.

4) U/A 13+ कॅटेगरी: यामध्ये हिंसेची अशी दृश्य असू शकतात जी पाहताना अगदी वास्तविक वाटू शकतात.

परंतु या दोन्ही कॅटेगरी मध्ये ( U/A- 7+ आणि U/A 13+ ) नग्नता, सेक्स आणि अश्लील गोष्टी नसाव्यात.

5) U/A 16+ कॅटेगरी: यामध्ये हिंसा आणि लैंगिक अत्याधिकतेसह स्वतःला इजा पोहचवण्याचे दृश्य सुद्धा असू शकतात. इथे ड्रग्सचा वापर सुद्धा दाखवला जाऊ शकतो आणि सोबतच कठोर आणि अश्लील भाषेचा उपयोग सुद्धा मान्य आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

6) A कॅटेगरी: या कॅटेगरीमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर सेक्स, हिंसा, आपत्तीजनक शब्द यांचा समावेश असलेला कंटेंट दाखवता येऊ शकतो. यात न्यूडिटी सोबतच सेक्स सीन आणि ड्रग्सचा वापर दाखवायला सुद्धा परवानगी आहे. Long form of OTT

Comments are closed.