Take a fresh look at your lifestyle.

‘जगात भारी माझी नऊवारी’ स्पर्धेला सुरुवात; महिलांचा लाभतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नगर : अजिंक्य भारत, माहेर ब्युटी पार्लर तसेच ऑन धिस टाईम मीडिया यांच्यातर्फे ‘जगात भारी माझी नऊवारी’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व महिलांनी या ऑनलाईन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन अजिंक्य भारतच्यावतीने करण्यात आले आहे. १० ऑगस्ट, २०२२ रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली असून महिलांनी आपले नऊवारीवरील फोटो फेसबुकवर पोस्ट करून अजिंक्य भारत, माहेर ब्युटी पार्लर तसेच ऑन धिस टाईम मीडियाच्या फेसबुकपेजला टॅग करावे. ही स्पर्धा १० ते १५ ऑगस्ट या दरम्यान होणार असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

ज्या नऊवारीला जास्तीत जास्त लाईक्स येतील, तिला विजेती घोषित करण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस सोन्याची नथ आणि पैठणी, द्वितीय बक्षीस सोन्याची नथ, तृतीय बक्षीस क्रोकरी सेट आणि चांदीचा शिक्का तर चौथे बक्षीस ज्वेलरी सेट आणि चांदीचा शिक्का देण्यात येणार आहे. याशिवाय, उत्तेजनार्थ २१ बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

तेजल परमार
७०५८८४४४३१

Leave A Reply

Your email address will not be published.