Take a fresh look at your lifestyle.

जम्मू काश्मीर : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता, त्याला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश प्राप्त झाले आहे. भारतीय जवानांवर दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता, त्यामुळे शिताफीने हा हल्ला परतवून लावण्यात जवानांना यश प्राप्त झाले.

‘या’ प्रकरणी अफजल खानबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक विधान

भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत ठार झालेल्या दोन दहशहतवाद्यांपैकी एक दहशतवादी जैश -ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे, त्याचे नाव कामरान भाई उर्फ हनीस असे असल्याचे समजते. दुसरा दहशतवादी हा पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती आहे. हे दोन्ही दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने या परिसरात सक्रिय होते.

भारत जोडो यात्रा : भाजपनेही पाठिंबा द्यावा; संजय राऊतांचे आवाहन

जम्मू काश्मीर च्या शोपीयानमधील कैपरीन भागात दहशहतवाद्यांची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाल्याने या भागात घेराबंदी करण्यात आली होती. या दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर जोरदार गोळीबा केला होता, त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले. मृतांपैकी एकाची ओळख पटली नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.