Take a fresh look at your lifestyle.

Important News! जन धन खातेधारकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला थेट खात्यात मिळणार ‘इतकी’ रक्कम

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई -Important News नागरिकांसाठी केंद्र सरकार(Central Government) तसेच राज्य सरकारद्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे जन धन खाते योजना. याच जनधन खातेधारकांसाठी (Jan Dhan Account) अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही हे खाते उघडले असेल तर आता तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळतील. कोणत्याही योजनेंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करते, त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जन धन खात्यात हस्तांतरित केले जातात.

💥होम लोन घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज

या सरकारी योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. जन धन खातेदारालाही या योजनेचा लाभ मिळतो.

केंद्र सरकारच्या मानधन योजनेत 18 वर्षे ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे हस्तांतरित केले जातात. यामध्ये वर्षाला 36 हजार रुपये ट्रान्सफर होतात.

😃VIRAL VIDEO : “पापाची परी स्कुटीवरून स्वतःच पडली अन् मागच्या बाईकस्वारावर चिडली !” व्हिडीओ पाहाच

लाभ कोणाला मिळतो?
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. पथ विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

याशिवाय तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

१ रुपयाही अतिरिक्त न देता मोफत घ्या Prime Video, Hotstar, Netflix चा आनंद; पाहा Jio चा भन्नाट प्लान
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे जन धन खाते असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे बचत खाते तपशील देखील सबमिट करावे लागतील.

किती प्रीमियम भरावा लागेल?
या योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला विविध वयोगटानुसार 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागते. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. तर 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील.

या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFSC कोड देणे आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.