Take a fresh look at your lifestyle.

जवळा सेवा सोसायटी निविडणुकीत मोठी चुरस

0
maher

अशोक निमोणकर, ओटीटी न्यूज नेटवर्क

जामखेड : जवळा सेवा सोसायटीसाठी शेतकरी विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यांची निशाणी पतंग असून विरोधी मंडळाने स्व.श्रीरंगराव कोल्हे व प्रदीप पाटील यांच्या नावाचा व फोटोचा वापर करू नये असे आवाहन शेतकरी विकास आघाडीचे दत्तात्रय कोल्हे व दिपक पाटील यांनी केले आहे.

शेतकरी विकास आघाडीचे कोल्हे व पाटील यांनी जवळा सेवा सोसायटीसाठी १३ उमेदवार जाहीर केले आहेत. कर्जदार मतदार संघातून नवनाथ पोपट बारस्कर, राजेंद्र रामचंद्र हजारे, अविनाश काकासाहेब लेकुरवाळे, काशिनाथ गहीनीनाथ मते, चंद्रहार किसन पागीरे, अरूण नामदेव रोडे, कैलास महादेव वाळुंजकर, शहाजी संभाजी वाळुंजकर (पवार), अनुसूचित जाती जमाती मधुन रूपचंद तुकाराम आव्हाड, महिला मतदार संघातून आयोध्या रामलिंग हजारे, सायरा सत्तार शेख, इतर मागासवर्गीय मतदार संघातून शिवाजी तुकाराम कोल्हे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून मच्छिंद्र मारूती सुळ असे १३ उमेदवार जाहीर करून त्यांची निशाणी पतंग असल्याचे जाहीर केले आहे.

पाटील व कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडी मंडळ निवडणूक लढवित असून या मंडळाला माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.महादेव पवार, आर. डी. पवार, चेअरमन आजीनाथ हजारे आदींनी पाठिंबा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.