Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेपाठोपाठ विरोधी पक्षनेतेपदावरुन राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नाराज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडानंतर राज्याचं राजकारण पालटलं. त्यानंतर आमदारांच्या बंडखोरीनंतर बरेचसे नगरसेवक देखील शिंदे गटात सहभागी झाले. राज्यातील सरकार अल्पमतात आल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी दिली गेली. मात्र, राष्ट्रवादीमध्ये या निर्णयामुळे आता नाराजी असल्याचं समोर येत आहे. अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक जयंत पाटील आहेत. अनेक वर्षांपासून आजवर त्यांनी गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक मंत्रालयांचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षाचे गटनेते असलेले पाटील हे या निर्णयामुळे इतके नाराज होते, की त्यांनी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र सभापतींना देण्यास नकार दिला, असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलं.

अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदासाठी पाठिंबा देणारे पत्र मागण्यासाठी धनंजय मुंडे जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा आपण थोड्याच वेळात पत्र देऊ असे पाटील म्हणाले परंतु त्यांनी पत्र दिले नाही. अखेर प्रफुल पटेल यांना जयंत पाटलांना दोन वेळा फोन करावा लागला. मात्र, ‘3 जुलै रोजी आमदारांची बैठक पार पडली, त्यात अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. यानंतर दुसर्‍याच दिवशी आपण विधासभा अध्यक्षांकडे तसं पत्र दिल्याचं’ जयंत पाटील यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.