Take a fresh look at your lifestyle.

एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार? जयंत पाटील स्पष्टच बोलले!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – MIM नं महाविकास आघाडीला युती करण्याची ऑफर देत राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एमआयएमने ही ऑफर विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक महाविकासआघाडीवर खोचक निशाणा साधत आहे. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी MIM ची ही ऑफर धूडकावून लावली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

संजय राऊत यांनी बोलतांना एमआयएम हा भाजपचा टीम ‘बी’ असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आता त्यांच्या या मुद्दयाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. सपाच्या पराभावला एमआयएम जबाबदार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय.

हेही वाचा – भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे ढग, येत्या 3 तासात ‘या’ जिल्ह्यात बरसणार सरी!

इतकच नाही तर, एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान देखील जयंत पाटील यांनी दिलं आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आपल्या घरी आले असता त्यांना युती करण्याबाबत ऑफर दिल्याचं इम्तियाज जलील म्हणाले होते.

“राजेश टोपेंनी ही चर्चा केली असेल असं वाटत नाही”

हेही वाचा – 🏏टी-20 विश्वचषकापूर्वीच भारत-पाकिस्तान आमनेसामने, आशिया कपच्या तारखा जाहीर

दरम्यान, पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “राजेश टोपे इम्तियाज जलील यांच्याकडे गेले होते. त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं म्हणून ते गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे की राजेश टोपेंनी तशी ती केलेली नसेल. त्यांच्याघरी कुणाचं निधन झालं असताना राष्ट्रवादीची अशी संस्कृती नाही की तिथे राजकीय चर्चा केली जाईल. त्यामुळे अशा चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही”

हेही वाचा – “‘ते’ व्हिडीओ काढा अन्यथा…”, आता रशियाची थेट गुगलला धमकी!

“औरंगाबाद निवडणुकीत कळेलच”

“उत्तर प्रदेश असेल की महाराष्ट्र असेल त्यांचा तसा प्रयत्न देखील सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे हे स्पष्ट होईल. आता हे कळेल की पालिका निवडणुकीत ते नेमकं भाजपला जिंकवणार आहे की हरवणार आहे”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी एमआयएमला आव्हान दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.