Take a fresh look at your lifestyle.

‘या’ प्लानपुढे जिओनेही हात टेकले; अवघ्या २२५ रुपयात लाइफटाइम वैधता

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आपल्यापैकी बऱ्याच जणाना आता दर महिन्याला रिचार्ज करण्याचा कंटाळा आला आहे. तीन महिने किंवा सहा महिन्याच्या वैधतेचा प्लान रिचार्ज करण्यापेक्षा अनेकांना वाटते की, लाइफ टाइम वैधतेचा (Life time validity) रिचार्ज प्लान हवा असायला हवा. परंतु, टेलिकॉम कंपन्यांकडे (Telecom companies) असा प्लान उपलब्ध नाही. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लान नसला तरी असा प्लान एक कंपनी देत आहे. या कंपनीचे नाव आहे MTNL. या कंपनीच्या २२५ रुपयाच्या प्लानमध्ये यूजर्संना लाइफ टाइम वैधता मिळते.

MTNL कंपनी देतेय असा प्लान : हो, तुम्ही जे ऐकलं आहे ते खरंच आहे. या प्लानमध्ये MTNL अनेक फायदे देते. एमटीएनएलचा २२५ रुपयाचा प्लान यूजर्ससाठी मस्त आहे. जाणून घ्या या प्लान संबंधी डिटेल्समध्ये.

MTNL कडून २२५ रुपयात अनेक बेनिफिट्स : या प्लानची किंमत २२५ रुपये आहे. यात यूजर्संना एकदा रिचार्ज केल्यानंतर लाइफटाइम दिलासा आहे. यात सिम आणि अकाउंटची वैधता लाइफटाइम आहे. यासोबतच १०० मिनिट कॉलिंग दिली जाते. व्हाइस कॉलिंगसाठी प्रति सेकंद ०.०२ पैस या दराने चार्ज केले जाते. एसटीडी कॉलसाठी हाच चार्ज केला जातो.

Vi का प्लान : वोडाफोन-आयडियाचा प्लान (Vodafone-Idea plan) २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना २४ दिवसाची वैधता मिळते. कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस (SMS) दिले जातात. यात यूजर्संना फ्री हेलोट्यून आणि विंक म्यूझिक फ्री दिले जाते.

Airtel चा प्लान : हा प्लान २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना २४ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत नंबर कॉलवर अनलिमिटेड कॉलिंगची (Unlimited calling) सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना फ्री हेलोट्यून आणि विंक म्यूझिक फ्री दिले जाते.

Jio चा प्लान : कंपनी २२२ रुपयाचा प्लान देत आहे. परंतु हा प्लान केवळ जिओ फोन यूजर्ससाठी आहे. यात यूजर्संना २८ दिवसाची वैधता देते. सोबत रोज २ जीबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. १०० एसएमएस रोज दिले जाते. Jio Apps चे सब्सक्रिप्शन दिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.