Take a fresh look at your lifestyle.

जिओची 5G सर्विस ‘या’ चार शहरात; 1gbps डेटाही मिळणार फ्री

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी भारतात आपली 5G सेवा सुरू केली आहे. Jio 5G आता दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये आपली सेवा देत आहे. Jio 5G वेलकम ऑफर अंतर्गत, कंपनी निवडक वापरकर्त्यांना 1gbps चा फ्री अनलिमिटेड डेटा मोफत देत आहे.

‘एनआयए’चे मिशन काश्मीर; अनेक ठिकाणांवर छापे

Ooklas Speedtest Intelligence Report नुसार, टेलिकॉम ऑपरेटर Jio आणि Airtel त्यांच्या 5G सर्विसची टेस्टिंग घेत आहेत. दोघांनी 809.94mbps पर्यंत 5G डाउनलोड गती नोंदवली आहे. या दोन्ही कंपन्यांनी व्यावसायिक टप्प्यात प्रवेश केल्यानंतर अधिक स्थिर गती उपलब्ध करून दिली जाईल. या अहवालात Ookla ने चार शहरांमधील Jio आणि Airtel च्या 5G डाउनलोड स्पीडची तुलना केली आहे.

मोठी बातमी : दाऊद टोळीशी संबंधित पाच जणांच्या मुसक्या आवळल्या; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दिल्लीमध्ये, एअरटेलने 197.98 एमबीपीएसवर सुमारे 200 एमबीपीएसची सरासरी डाउनलोड स्पीड नोंदवली. याच्या तुलनेत जिओने आतापर्यंत ६०० एमबीपीएसचा वेग नोंदवला आहे. एअरटेलने कोलकाता येथे 33.83 एमबीपीएसचा सरासरी डाउनलोड स्पीड नोंदवला. रिलायन्स जिओने जून महिन्यात सरासरी 482.02 एमबीपीएस डाउनलोड स्पीड नोंदवला.

अखेर ठरले, पालघर साधू हत्याकांडाची चौकशी सीबीआय करणार; राज्य सरकारची स्वीकृती

एअरटेलने मुंबईत सरासरी डाउनलोड स्पीड 271.07mbps नोंदवला. तर Jio ने जूनपासून सरासरी 515.38mbps चा डाउनलोड स्पीड आणला आहे. एअरटेलने वाराणसीमध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीड 516.57 Mbps मिळवला. Jio ने जून 2022 पासून सरासरी 485.22 Mbps ची डाउनलोड गती गाठली आहे. रिलायन्स जिओने दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि वाराणसीसह चार शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेल सध्या 8 शहरांमध्ये आपली 5G सेवा देत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.