Take a fresh look at your lifestyle.

१९७२ पासूनचे बंधारे, तलाव होणार पुनर्जिवीत, कर्जत-जामखेडमधील 10 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

0

अशोक निमोणकर, ओटीटी न्यूज नेटवर्क

जामखेड – कर्जत व जामखेडमधील विविध बंधारे, पाझर तलाव इत्यादी एकत्रित ४९ जलसाठ्यांच्या दुरूस्तीसाठी दहा कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार रोहित पवार यांनी सतत पाठपुरावा करून या कामांना मान्यता मिळवून दिली आहे. यामुळे गळके बंधारे, तलाव अटणार नाही. ते पुनर्जिवीत होणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

राज्यात १९७२ पासून सरकारतर्फे बांधण्यात आलेल्या जुने पाझर तलाव, गाव तलाव तसेच विविध बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. कर्जत जामखेड तालुक्यात असे बंधारे, तलाव मोठ्या प्रमाणावर आहे. या बंधारे, तलाव पावसाचे पाणी साचले तर गळतीमुळे ते कोरडेठाक पडतात. त्यामुळे या गळके बंधारे तलाव म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहेत.

आ. रोहीत पवार यांनी मतदारसंघातील १९७२ पासून असलेले बंधारे, तलाव याबाबत आढावा घेऊन ते कोणत्या योजनेत बसतील याची माहिती घेतली. व त्यानुसार मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यात कर्जत जामखेड मधील ६९ जलसाठ्यांच्या दुरूस्तीसाठी ११ कोटी ७९ लाख मंजुर करून घेतले.

दुसऱ्या टप्प्यात कर्जत तालुक्यातील २९ कामासाठी ५ कोटी ४७ लाख ७४ हजार, तर जामखेड तालुक्यातील ३२ कामांना ४ कोटी ३४ लाख ३ हजार रुपये सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच यासारखी मतदारसंघातील विविध कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी आमदार रोहित पवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन तसेच शासनस्तरावर वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा करत आहेत.

तलाव तसेच बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव निधी मिळाला नव्हता मात्र राज्य सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी शासन स्तरावर हा मुद्दा लाऊन धरला आणि मृदा व जलसंधारण विभागाला त्यांनी मतदारसंघातील बंधारे व तलावांच्या असलेल्या परिस्थितीची माहिती दिली.

त्यानंतर आता मतदारसंघातील जलसाठ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित असलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि या कामासाठी भरीव निधी देखील मिळाला आहे. यामुळे जलसाठ्यातून पाण्याचा होणारा अपव्यव्य मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शिवाय संबंधित पाझर तलाव, बंधारे इत्यादी देखील पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. यामुळे मतदारसंघातील नागरिकांची पावसाळा संपला की बंधारे आटतात ही तक्रार मात्र रोहितदादांच्या प्रयत्नांमुळे कायमची मार्गी लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळे माझ्या मतदारसंघात मी मोठ्या प्रमाणात नवीन कामे मंजूर करून आणू शकत आहे. पूर्वीच्या काळात होत असलेल्या अशा कामांना योग्य तो दर्जा नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. तसेच यामध्ये आता आम्ही शेतकऱ्यांना होणारी अडचण लक्षात घेऊन कामाचा दर्जा सुधारला आहे आणि ही अडचण कायमची दूर करत आहेत. यापुढेही मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.