Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक एकादशी : देवेंद्र फडणवीस सपत्नीक करणार विठूरायाची महापूजा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राचे प्रसिद्ध दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची वर्षातून दोनदा म्हणजेच आषाढी व कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करण्यात येते. आषाढी एकादशीचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येतो, त्यानुसार यंदा आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली होती. कार्तिक एकादशीचे सुद्धा आगळेवेगळे महत्व असून हा महिना अतिशय पवित्र मानण्यात येतो. कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशी ही आध्यात्मिकदृष्ट्या फार मोठे महत्व राखते.

ग्रामपंचायत निवडणूक 2022: भाजपने मारली बाजी; ‘या’ जागी आश्चर्यजनक निकाल

यंदा पंढरपूरला कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला असून, ते सपत्नीक विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेऊन महापूजा करणार आहे. याबाबतीत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसरकर महाराज यांनी अधिकृत माहिती दिली आहे. कार्तिकी महापूजेचे निमंत्रण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

गो तस्करी करणाऱ्यांना ‘या’ राज्याने दिला दणका; जप्त करण्यात आलेल्या मांसाची प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार

आजवर फडणवीस यांनी चार वेळा आषाढी एकादशीला पंढरपूरला महापूजेला हजेरी लावली असून यंदा ते पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची महापूजा करणार आहे. त्यामुळे आषाढी व कार्तिकी या दोन्ही पूजेचा मान मिळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले राजकारणी ठरणार आहे. यापूर्वी वर्ष २०१८ साली मराठा आरक्षण मोर्चाने कठोर आंदोलन केल्याने फडणवीसांनी अखेर वर्षा बंगल्यावरच आषाढी एकादशीची पूजा केली होती.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.