Take a fresh look at your lifestyle.

‘युतीचं भान ठेवा’; बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आणि 10 अपक्षांसह एकूण 50 आमदारांसह बंडखोरी केली, त्यानंतर भाजपसोबत युती करून ते मुख्यमंत्री झाले. शिंदे-भाजप युतीला दोन महिन्यांहून कमी कालावधी लोटला असून, दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या वादाचं कारण म्हणजे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विधान.

‘या’ गृहकर्ज देणाऱ्या संस्थांचे व्याजदर महागले; घर घेणे पूर्वीपेक्षा महाग होण्याची चिन्हे

अमरावती येथील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात रविवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. बावनकुळे यांनी दहीहंडीच्या या कार्यक्रमात बोलताना अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेराचा आमदार भाजपचाच असेल, असे विधान केले होते. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा भाजपमध्ये जाण्याचे संकेत असल्याचेही बोलले जात होते.

करुणा शर्माचा गौप्यस्फोट; देशातून पलायन केल्यास ५० कोटींचे आमिष

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात दाखल झालेले अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ चांगलेच नाराज झाले आहेत. राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयमाने बोलावे. अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, त्यामुळे भाजपचे आमदार, खासदार चुकीचे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण सोबत आहोत हे लक्षात ठेवावे, असे सांगून आनंदराव अडसूळ यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याची फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.