Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या विरुद्ध पोस्ट केतकी चितळेला भोवली, पोलिसांची पहिली कारवाई

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय. आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

😍OnePlus Offers:आता बजेटची चिंता सोडा, केवळ अर्ध्या किमतीत खरेदी करा OnePlus चा ‘हा’ पॉवरफुल 5G स्मार्टफोन

नक्की प्रकरण काय?
केतकी चितळेने संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं विडंबन करुन शरद पवारांवर वादग्रस्त फेसबूक पोस्ट केली. यानंतर केतकीच्या या फेसबूक पोस्टचं नेटकऱ्यांनी निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही या विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच विविध ठिकाणी तक्रार ही दाखल केली.

राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. केतकीनं या वादग्रस्त पोस्टद्वारे 2 राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलंय. तसेच केतकीने पवारांना उद्देशून मानहानीकारक पोस्ट केली असल्याचं नेटकेंनी दिलेल्या तक्राती म्हटलंय.

ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की

कळवा पोलिसांनी या तक्रारीवरुन केतकी विरोधात गुन्हा दाखल केलाय. कळवा पोलिसांनी कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ ए या नुसार गुन्हा दाखल केला आहे.

विदर्भातील अकोला जिल्ह्यात तक्रार

दरम्यान केतकीच्या या वादग्रस्त पोस्टचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. कळवा पाठोपाठ आता विदर्भातील अकोला जिल्ह्यातील खदान येथे एका तरुणीने तक्रार दिली आहे, याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

बापरे! रातोरात झाला कोट्याधीश! खात्यात अचानक आले तब्बल 25 कोटी रुपये, पण…

Comments are closed.