Take a fresh look at your lifestyle.

Kia EV9 किआची ही गाडी पाहिलीत का? अर्ध्या तासात होणार 80 टक्के चार्ज

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Kia EV9 जगप्रसिद्ध असलेल्या किआ मोटर्सला भारतात देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. मागच्या काही वर्षात किआ मोटर्सने भारतीय बाजारात चांगलाच जम बसवलाय. किआ मोटर्सच्या गाड्यांना भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. किआ इंधन आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या भारतात आणण्याच्या तयारीत आहे. त्यात एसयूव्ही गाड्यांचाही समावेश आहे. यासाठी कंपनीची जोरदार तयारी सुरु आहे.

Samsung सॅमसंगचा जबरदस्त 5G स्मार्टफोन येतोय, कमी किमतीत मिळतील भारी फीचर्स

किआच्या EV9 या गाडीबाबत प्रचंड ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2023 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत लाँच करणार आहे. त्यानंतर थ्री रो एसयूव्ही भारतात लाँच होणार आहे. अलीकडेच ही गाडी पूर्णपणे स्टिकर्समध्ये स्थितीत दिसली आहे.

FASTag रिचार्ज करताना या चुका करू नका; अन्यथा अकाउंट होईल रिकामं

Kia EV9 किआ EV9 ही थ्री रो एसयूव्ही असून 6 आणि 7 सीटर प्रकारांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही किआची सर्वात महागडी इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये एलए ऑटो शोमध्ये पहिल्यांदा ही कार प्रदर्शित केली होती.

किआने न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये EV9 लाँच केल्याची पुष्टी केली आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही ह्युंदाई मोटर्सच्या e-GMP प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन लाइनअपमध्ये EV9 शीर्षस्थानी जागा घेईल.

महत्वाची बातमी! खासगी डेअऱ्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका

किआ EV9 सादर करताना कोरियन ऑटोमेकरने पुष्टी केली आहे की, इलेक्ट्रिक एसयूव्ही वेगवान चार्जिंगसह प्रदान केली जाईल. 10 टक्क्यांपासून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतील. Kia EV9 news

एसयूव्ही एका चार्जमध्ये सुमारे 500 किमीची रेंज देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय कारचे केबिन हायटेक फीचर्सने सुसज्ज असेल. एसयूव्ही मोठ्या आकाराची आहे, त्याची लांबी 4,930 मिमी, रुंदी 2,055 मिमी आणि उंची 1,790 मिमी आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.