Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरे स्वत: बिल्डर, त्यांना मलिकांचा घोटाळा आधीच माहीत होता; भाजप नेत्याचा मोठा आरोप

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : दाऊद गँगशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत न्यायालयाने कठोर टिपण्णी केल्यानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा स्वत: बिल्डर आहे. बिल्डर लोकांना अशा गोष्टी लगेच कळतात. त्यामुळे त्यांना नवाब मलिक यांचा घोटाळा आधीच माहीत होता,’ असा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

बापरे! या कंपनीची अजब गजब ऑफर; फक्त Burger-Sandwitch खाण्यासाठी महिन्याला तब्ब्ल 94 हजार रुपये पगार

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ‘नवाब मलिक यांचं समर्थन करण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केलं होतं. मात्र मलिक यांचा दाऊद गँगशी संबंध असल्याचं आता कोर्टानेच सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कोर्टाविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार का,’ असा खोचक सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

FD आणि Home Loan च्या व्याजदरात मोठा बदल! जाणून घ्या कोणती बँक देणार किती फायदा?
नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर आहेत आणि उद्धव ठाकरे हे मलिकांचे पार्टनर आहेत. त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरेंनीच आता उत्तर द्यायला हवं, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांबाबत न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं?

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र सादर केलं होतं. या आरोपपत्राची दखल घेत नवाब मलिक यांच्यावर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यासाठी पुरेसा आधार असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तसंच आरोपीचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंध असल्याचं सकृतदर्शनी दिसत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

IMPORTANT! आता केवळ दोन मिनिटात मिळवा Whatsapp वर होम लोन; ‘या’ बँकेची खास सुविधा; असा करा अर्ज

Comments are closed.