Take a fresh look at your lifestyle.

किरीट सोमय्या यांच्या मुलाभोवती आवळला फास; मुंबई पोलिसांकडून ‘या’ प्रकरणी चौकशी सुरू

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय जनता पक्षाने विविध केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून, महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी सुरू असताना महाविकास आघाडीनेही भाजपला जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. विविध नेत्यांविरोधात आरोपाची राळ उडवणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मुलाभोवती मुंबई पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

भारताने तयार केली जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अशी करा फक्त 10 हजारात बुक

सात जणांचे जबाब नोंदविले

सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहेत. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेकांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. आता एका प्रकरणात सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे समजते.

राऊत यांनी केले होते आरोप

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही चौकशी सुरू केली आहे. वसई येथे जमीन खरेदी केल्याप्रकरणी नीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील तक्रारदाराचे जबाबही नोंदवले आहेत. नील आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवन यांच्यात संबंध असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. तसेच राऊतांनी ”बाप-बेटे लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे ट्वीट काही दिवसांपूर्वी केले होतं. त्यातच आता मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी कंबर कसल्याने चर्चांना ऊत आला आहे.

आयपीएलमधून मिळणार टीम इंडियाला नवीन कॅप्टन; जाणून घ्या कोण आहे ‘हा’ क्रिकेटपटू?

आरोप सिद्ध करण्याचे आव्हान

राऊत यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. नील यांनी निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर राऊत यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, असे आव्हान सोमय्या यांनी दिले होते.

आता ‘या’ पक्षाला मोठा धक्का; सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

याचिका घेतली मागे

दरम्यान, राऊत यांच्या आरोपानंतर नील यांनी काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे. ‘राज्य सरकार सोमय्या यांच्या विरोधात सध्या कोणत्याही प्रकारची चौकशी करत नाही,’ अशी माहिती राज्य सरकारने त्या वेळी दिली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.