Take a fresh look at your lifestyle.

किसान मोर्चाचे उपाध्‍यक्ष गुज्‍जर यांची लोणी येथे भेट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

लोणी : मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्‍यप्रदेशमध्‍ये कृषी उत्‍पादीत मालाच्‍या साठवण क्षमतेसाठी सुरु केलेली योजना त्‍या राज्‍यातील शेतक-यांच्‍या हिताची ठरली. या योजनेचा स्विकार करुन, त्‍याची अंमलबजावणी झाली तर राज्‍यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल असे मत आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी किसान मोर्चाच्‍या पदाधिका-याशी चर्चा करताना व्‍यक्‍त केली.

भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व महाराष्‍ट्राचे प्रभारी बन्‍सीलाल गुज्‍जर, प्रदेशअध्‍यक्ष वासुदेव काळे, प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके, सुशिल तरवेजा, अशोक कर्नावट यांनी लोणी येथे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी भेट घेवून सहकार आणि कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. या सर्वांचे स्‍वागत आ.विखे पाटील केले.

महाराष्‍ट्राने सहकार चळवळीच्‍या माध्‍यमातून साधलेल्‍या कृषी विकासाचे गुज्‍जर यांनी समाधान व्‍यक्‍त करुन, सहकारी आणि खासगी कारखान्‍यातील स्‍पर्धेबाबत त्‍यांनी माहीती जाणून घेतली. सद्य परिस्थितीत उसाच्‍या गाळपा संदर्भातही सगळीकडेच निर्माण झालेल्‍या प्रश्‍नावरही उभय नेत्‍यांमध्‍ये चर्चा होवून कृषी क्षेत्रामध्‍ये प्रामुख्‍याने मजुरांचा मोठा प्रश्‍न सर्वत्र भेडसावत आहे. मध्‍यप्रदेशमध्‍ये सुध्‍दा ही समस्‍या मोठी असल्‍याचे गुज्‍जर यांनी सांगितले. मध्‍यप्रदेश जिल्‍हा स्‍तरावर खासगी बाजार समितीच्‍या माध्‍यमातूनही चांगली आर्थिक उलाढाल होत असल्‍याचे त्‍यांनी या चर्चेदरम्‍यान सांगितले.

आ.विखे पाटील यांनी राज्‍यात खासगी कारखान्‍यांचे प्रस्थ वाढत असले तरी, सहकारी साखर कारखान्‍यांनी शेतक-यांचा विश्‍वास संपादन केला हीच या चळवळीची जमेची बाजू आहे. सहकारी पतसंस्‍था, सहकारी बॅका या माध्‍यमातून ग्रामीण अर्थकारणाला आणि विकासाला स्‍थैर्य मिळाले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राहाता कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या संदर्भातही आ.विखे पाटील यांनी या शिष्‍टमंडळास माहीती दिली. कोव्‍हीड काळातही या बाजार समितीने शेतक-यांचे हित जोपासले आहे. नगरसह नाशिक आणि इतर जिल्‍ह्यातून कांदा, डांळींब आणि इतर कृषी उत्‍पादीत माल शेतकरी आणत असून, रोखीने व्‍यवहारा होत असल्‍याने शेतक-यांचा ओढा या बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात वाढला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.