Take a fresh look at your lifestyle.

आता Driving license बनवणं झालं अधिकच सोपं, जाणून घ्या नवीन प्रोसेस

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Online Driving license भारतात कोणतीही सरकारी कादपत्र बनवणं म्हणजे मोठं टेन्शनचं काम असतं. सबंधित सरकारी कार्यालयात लांबच लांब रांगा, सबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या ठरलेल्या वेळा अशा अनेक अडचणींना नागरिक तोंड देतात. ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना) बनवणं तर त्याहून अवघड. कारण यात रांगा, अधिकाऱ्यांच्या वेळांसह तुमची ड्रायव्हिंग टेस्टसुद्धा असते.

Google Pay आणि Paytm वापरताना या ५ टिप्स लक्षात ठेवाच; अन्यथा होईल…

दुसरी गोष्ट म्हणजे चालक परवान्याशिवाय वाहन चालवणं कायद्याने गुन्हा आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय (DL) वाहन चालवणे म्हणजे खिशाला मोठी कात्री लावण्यासारखं आहे. कारण विना परवाना वाहन चालवल्यास ५,००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे, जी पूर्वी केवळ १००० रुपये इतकी होती. मात्र आता देशातल्या काही राज्यातील नागरिकांना यात दिलासा मिळाला आहे. कारण आता काही राज्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यात आली आहे. Driving license

🤩Hero Splendor Offer : हिरो स्प्लेंडर प्लस खरेदी करा फक्त २५ हजार रुपयांत

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया कमी त्रासदायक आणि सोपी झाली आहे. जर तुम्ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली एनसीआर किंवा झारखंडचे रहिवासी असाल तर तुम्ही एक सोपी प्रक्रिया पार पाडून वाहन चालवण्याचा परवाना मिळवू शकता.

आताची सर्वात मोठी बातमी! लवकरच तुमच्या दारी 5 जी सेवा… स्पेक्ट्रम लिलावाला केंद्राची मंजुरी!

कारण या राज्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया आता डिजिटल केली आहे. म्हणजेच तुम्हाला आता त्यासाठी आरटीओ ऑफिसबाहेर लांबच लांब रांगेत उभं राहावं लागणार नाही. महाराष्ट्रात ही प्रक्रिया आधीपासूनच अस्तित्वात आहे. चला तर मग चालक परवाना बणवण्याची नवीन आणि सोपी प्रक्रिया जाणून घेऊया.

मॉडिफाय केलेली कार घेऊन बाहेर पडलात तर भरावा लागेल हजारोंचा दंड, पाहा काय आहे RTO नियम

नवीन प्रक्रियेनुसार तुम्ही चार टप्प्यांमध्ये तुमचं लायसन्स बनवू शकता. सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करायचा, मग शुल्क जमा करायचं, त्यानंतर एक ऑनलाईन टेस्ट द्यायची आणि त्यानंतर तुमच्या सोयीनुसार वेळ निवडून आरटीओ केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची. या लेखात वर नमूद केलेल्या राज्यांमध्ये राहणारे लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करून दिलेला फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे फॉर्मसोबत अपलोड (सॉफ्ट कॉपी) करावी लागतील. यासोबतच तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुमच्या सोयीनुसार एक स्लॉट देखील बुक करू शकता.

पुढील महिन्यात येतेय देशातील सर्वात स्वस्त Electric Car, बुकिंगला झाली सुरुवात

ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच्या नवीन आणि ऑनलाईन प्रक्रियेनुसार तुम्ही तुमच्यासाठी योग्य असा स्लॉट बुक केल्यानंतर लगेचच ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शुल्क जमा करावं लागेल. त्यानंतर अर्जदार त्याच्या सोयीनुसार परीक्षेची तारीख निवडू शकतात. तुम्ही यासाठीचं शुल्क देखील ऑनलाईन भरू शकता.

ऑनलाईन टेस्टनंतर लर्निंग लायसन्स मिळणार

अर्ज केल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स (शिकाऊ चालक परवाना) दिलं जाईल. मात्र त्याआधी तुम्हाला ऑनलाइन टेस्ट द्यावी लागते. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या संबंधित परिवहन कार्यालयात ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल. या ऑनलाइन परीक्षेत एकूण १० प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरं केवळ १० मिनिटांत द्यावी लागतात. जे अर्जदार १० पैकी ६ किंवा अधिक प्रश्नांची बरोबर उत्तरे देतील त्यांना या परीक्षेत उत्तीर्ण जाहीर केलं जातं. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र अर्जदाराच्या ई-मेल आयडीवर पाठवलं जातं. त्यानंतर तुम्ही कुठूनही या ऑनलाईन प्रमाणपत्राची प्रिंट आउट घेऊ शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.