Take a fresh look at your lifestyle.

Kolhapur Election – मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ एक भाषण आणि भाजपचा करेक्ट कार्यक्रम! नेमंक काय घडलं?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर – Kolhapur Election नुकतीच कोल्हापूर विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली. काल या निवडणुकीचे निकाल हाती आले आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उत्तर कोल्हापूर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दरम्यान, या पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव तर भाजपचे सत्यजित कदम उभे होते. भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा दारूण पराभव केला आहे.

IMPORTANT: तुमचं Pan Card वापरून इतर कोणी loan घेतलंय का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

जयश्री जाधव यांना 96176 मते मिळाली तर सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना 77426 मते मिळाली. हा निकाल म्हणजे भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यासाठी एक झटका मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण असं काय झालं की, जयश्री जाधव यांना लाखाच्या घरात मते मिळाली?

उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेच राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार केला. मात्र, ही जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडली. उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज झाले होते. नाराज झालेल्या राजेश क्षीरसागर हे दोन दिवस नॉट रिचेबलही होते. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. क्षीरसागर यांच्या घराबाहेर हजारो कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली. शक्तिप्रदर्शन केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आणि क्षीरसागर यांना आता थेट मातोश्रीवरून बोलावण्यात आले आणि त्यांची नाराजी दूर केली.

BREAKING! ६४ सहकारी बँकांसह ८ मोठ्या बँकाही बुडाल्या! केरळसह पंजाब आणि महाराष्ट्र संकटात

मात्र, असे असले तरी राजेश क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यासोबतच शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? असा सवालही भाजपकडून उपस्थित केला जात होता. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसेल आणि भाजपचा विजय सोपा होईल असा अंदाज भाजपने मांडला होता. पण प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एक सभा झाली आणि सर्व चित्रच पालटलं.

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि उद्धव ठाकरेंची ही एक सभा भाजपच्या पराभवाला हातभार लावणारी ठरली असल्याचं बोललं जात आहे.

अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल बंपर कमाई

Leave A Reply

Your email address will not be published.