Take a fresh look at your lifestyle.

कोठारी व पवार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स

0
maher

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषी उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्ेशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे. यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषी पदविचा कृषी उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येतो.

तसेच विद्यापीठाच्या १० जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि कृषी विज्ञान केंद्रे येथील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतो जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषी महाविद्यालयांना, कृषी संशोधन केंद्रांना व कृषी विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्‍या शेतकरी, अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रे, कृषी तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.

एप्रिल 2022 या महिन्याकरीता शेतकरी आयडॉल म्हणून (सातमाने, ता. मालेगांव, जिल्हा नाशिक) येथील रविंद्र पवार व कृषी उद्योजक म्हणून पुणे कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी (कृषी) चे शिक्षण घेतलेले (मोहोळ, जि. सोलापूर) येथील किरण कोठारी यांचा समावेश आहे. रविंद्र पवार यांनी डाळिंबाची शेती करुन युरोप तसेच आशिया खंडामध्ये निर्यात करत आहेत. त्यांनी शेतीत वापरण्याजोगी यंत्रे स्वतःच्या अनुभवावरुन तयार केली असून 90 टक्के शेती मजुरमुक्त केली आहे. कृषी उद्योजक असलेले किरण कोठारी यांनी कोठारी अ‍ॅग्रीटेक प्रा.लि.च्या माध्यमातून अत्याधुनिक इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकर्‍यांसाठी दर्जेदार उत्पादने तयार केली आहेत. युरोपीयन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने मॅन्युफॅक्चरींगमध्ये 100 टक्के अ‍ॅटोमेशन करुन उत्पादनांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना सर्व उत्पादनांचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानंकाप्रमाणे ठेवण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.