Take a fresh look at your lifestyle.

मोदी, शहांना शिव्या देणं सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शहर भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुणे भाजपातर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलताना चंद्रकांत पाटल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख करत वक्तव्य केले. मोदी आणि शहा यांचा अपमान करणारे चंद्रकांत पाटील यांना चालणार नाहीत.

100 डेज पूर्ण : शिंदे सरकारचे महत्त्वपूर्ण 72 निर्णय

कोथरुड मतदारसंघामधून चंद्रकांत पाटील यांनी देण्यात आलेली संधी आणि त्यावरून झालेला वाद याबद्दल भाष्य केलं. या निवडणूक प्रचारामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे अनेकदा पंतप्रधान मोदी यांना शिवीगाळ करत होते, असा दावा पाटील यांनी केला. मात्र आपण शेट्टींना सव्वा लाख मतांनी हरवलं. काही दिवासांपूर्वी शेट्टी एका केंद्रीय मंत्र्यांना भेटले त्यावेळी त्यांनी ‘दादांनी मला संपविले असे सांगितले.

‘ईडी’चे देशाच्या राजधानीसह पंजाब, हैद्राबादमध्ये ३५ ठिकाणी छापे; केजरीवाल म्हणाले…

त्यावर त्या मंत्र्यानी ‘दादा कोणाला संपवत नाही. एकवेळ ते आई शिवी दिली तर सहन करतील, पण मोदीजी आणि शहांना शिव्या दिलेले कोणालाही सहन करत नाहीत. नशीब तुम्हाला पाडला, बाकी काही करणे त्याचा स्वभाव नाही.’’ असे त्या मंत्र्याने शेट्टी यांना सांगितल्याचा प्रसंग पाटील यांनी सभागृहात सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला.

3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन

चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मेळाव्यात मिसाळ, मुळीक यांनी कार्यकर्त्यांना खरा न्याय द्यावा, अशी मागणी केली. काहीजण आपली सत्ता गेल्याने वैतागले होते, दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी कुंपणावर बसले होते, त्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी मागणी केली होती. सभागृहातील कार्यकर्त्यांनी गद्दारांना घरी बसवण्यास पाटील यांना साद घातली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.