Take a fresh look at your lifestyle.

भयंकर! ‘लेडी मास्टर माइंड’चे पराक्रमच असे की, पोलीस सुद्धा चक्रावले

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

औरंगाबाद – सध्या देशासह राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्याचं काम पोलीस प्रश्न चोख बजावत आहे असं आपण म्हणू शकतो. शहरात फसवणूकीसारख्या काही घटना ताज्या असतानाच औरंगाबादमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शहर पोलिसांनी एका व्यवसायिकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र पोलीस तपासात जी माहिती समोर आली त्याने खुद्द पोलिसांना सुध्दा धक्का बसला, कारण या व्यवसायिकाच्या कार्यालयातील नोकर महिलेनेच सुपारी देऊन ही लूटमार घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या टोळीतील चार आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल सुध्दा पोलिसांनी परत मिळविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समर्थनगरात स्कायलाईन पार्क बिल्डिंगमध्ये अशोक पाटील यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात बुधवारी दुपारी दोन जणांनी पाटील यांना मारहाण करून हातपाय बांधून ११ तोळे सोन्याचे दागिने लुटले होते. भरदुपारी घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. दरम्यान पाटील यांनी त्यांच्या कार्यालयातील रचना तुळशीराम निंभोरे (रा. भाग्योदयनगर, सातारा परिसर) हिच्यावर संशय व्यक्त केला होता.

पोलिसांनी रचनाच्या मोबाईलची कॉल डीटेल्स काढली आणि त्यावरुन रचनाच या सर्व प्रकरणाची मास्टर माइंड असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. नदीम खान नजीर खान (रा. शम्सनगर, शहानूरवाडी) याच्यामार्फत तिनेच लूटमारीची सुपारी दिली असल्याचं तिने तपासात सांगितले. तसेच या लुटमारीनंतर लुटीतील सोन्यात रचना ४० टक्के, नदीम खान २० टक्के आणि सुपारी घेतलेले रोहित विठ्ठल बोर्डे आणि विवेक अनिल गंगावणे (दोघे रा. गल्ली नंबर 3 उस्मानपुरा) यांचा वाटा ४० टक्के देण्याचे ठरले होते.

बुधवारी दुपारी रचनाने कार्यालयात पाटील एकटेच असल्याची खात्री केल्यानंतर रोहितला मिस कॉल दिला. रोहित व विवेक यांनी कार्यालयात येत पाटील यांचे हातपाय बांधून सोने लुटले. लुटीनंतर आरोपींनी लासूर स्टेशन गाठले. पोलिसांनी रचनाला ताब्यात घेऊन तिच्या मोबाईलवरून रोहितला सोन्याची वाटणीविषयी विचारले, तेव्हा तो घरी आला. गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने लुटलेले ५ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने काढून दिले. त्यानंतर पोलिसांनी नदीम, विवेक यांना सुद्धा ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.