Take a fresh look at your lifestyle.

ऐन दिवाळीसमोर लाल परी देणार धक्का; प्रवाशांच्या खिशाला कात्री

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाल परीचा धक्का बसण्याची शक्यता आहे. एसटीच्या भाड्यात वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नैसर्गिक भाड्यात १० टक्के वाढ होणार असल्याचे चन्ने यांनी स्पष्ट केले.

बैठकीत चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. याशिवाय महामंडळ 700 नवीन बसेस खरेदी करणार आहे. राज्याच्या ताफ्यात 700 नवीन अत्याधुनिक बसेस दाखल होणार आहेत. पुढील महिन्यात नवीन बसेस दाखल होणार आहेत. याशिवा महामंडळ 500 बसेसचे कंत्राट घेणार आहे. कॉर्पोरेशन आता डिझेल बसेसवरून इलेक्ट्रिक बसेसकडे वळणार आहेत. जीपीएसच्या धर्तीवर एसटीबसमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.