शेतजमीन खरेदी विक्री करताना घ्यावयाची काळजी : land buying procedure

0

land buying procedure : शेत जमीन खरेदी किंवा विक्री हा सर्वसामान्यपणे दोन व्यक्तीतील व्यवहार नसून ती एक कायदेशीर तरतूद आहे परंतु लोकांच्या वाईट प्रवृत्तीमुळे बर्‍याचदा या ठिकाणी वाद निर्माण होतात. 

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जमीन मालकाने  जमीन  विकल्यानंतर त्याच्या नातेवाईक म्हणजेच भाऊ आई बहीण किंवा बायको यांनी त्या जमिनीवर हक्क सांगणे किंवा त्या जमिनीचा मोबदला मागणे असे अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात.

त्यामुळे जमीन खरेदी क्या खरेदी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते आपण  बघणार आहोत.

  • जमिनीचा सातबारा वर प्रत्यक्ष मालक कोण आहे ते बघणे 
  • सातबार्‍यावर इतर कोणाचा हक्क असू शकतो का हे देखील चेक करणे
  • शिवाय ही जमीन जमीन मालकाच्या नावावर कशा पद्धतीने आलेली आहे ते देखील चेक करणे 
  • जमिनीवर कोणाचे कर्ज आहे का ते बघणे उदाहरणार्थ बँक वित्तीय संस्था इत्यादी 
  • शेत जमिनी साठी रस्ता आहे का ते चेक करणे 
  • जमिनीवर असलेले झाडे विहीर यांचे हक्क चेक करणे 
  • इतर हक्कांमध्ये कूळ किंवा अन्य व्यक्तींचे हक्क आहेत का ते चेक करणे 
  • सातबार्यावर असलेली जमीन व प्रत्यक्ष असलेली जमीन याच्यामध्ये काही तफावत आहे का ते देखील चेक करणे 
  • गावामध्ये चालू असलेल्या शेत जमिनीचे भाव चेक करणे
  • जमीन खरेदी करताना कुठल्याही इतर कायद्याचा भंग होत नाही याची देखील खात्री करणे उदाहरणार्थ पुनर्वसनकायदा भूसंपादन कायदा नागरी कमाल जमीन धारणा कायदा इत्यादींचा याठिकाणी समावेश आहे का हेदेखीलखात्री करणे
  • जमिनीचा व्यवहार करताना डायरेक्ट जमीन मालकाशी व्यवहार करावा मध्यस्थी असले तरी चालतील परंतु एकदा  मूळ जमीन मालकाशी बोलणे करून घ्यावे व खात्री करून घ्यावी
Leave A Reply

Your email address will not be published.