तुमच्या शेतजमिनीचा बांध कोरला तर, असे काढा जमिनीचे अतिक्रमण Land Record Detail

0

अतिक्रमण कसे काढावे ? Land encroachment

 

Land Record Detail : ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण असतेच. अतिक्रमण म्हणजेच दुसऱ्याच्या जमिनीवर ताबा करणे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत खुणा रोवलेल्या नसेल, तर अतिक्रमण होण्याची दाट शक्यता असते. 

काही लोक अतिक्रमण सोडण्यासाठी पैसे मागतात. यामुळे वादविवाद होतात. पण आता कोणाला बोलायचे काम नाही तसेच वाद घालण्याचे देखील काही काम नाही. तर योग्य मार्गाने अतिक्रमण केलेल्या व्यक्तीला धडा शिकवू शकता.

 

शेतकऱ्यांना माहित नसते की अतिक्रमण कसे काढावे. या कारणांमुळे शेतकरी वादविवाद होऊन भांडणाला सुरुवात होते. या वादविवाद पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जमिनीचे कायदेशीर मार्गाने अतिक्रमण काढू शकता.

 

अनेक शेतकरी जमिनीची मोज मापणी करून देखील अतिक्रमण सोडायला तयार होत नाही. तर यामुळे हे प्रकरण तुम्ही दिवाणी न्यायालयात सादर करतात. परंतु निकाल लागण्यास फार वेळ लागतो.

वडिलोपार्जित जमीन नावावर अशी करा 

 

जमिनीच्या अतिक्रमण प्रकरणास जास्त वेळ लागू नये म्हणून महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम कलम 138 नुसार तुम्ही तहसीलदाराकडे शेतजमीन वरील अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करू शकता.

असे काढा शेतजमिनीचे अतिक्रमण Land encroachment

 

  • अर्जदाराच्या ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्याच्या शेतजमिनीचा कच्चा नकाशा (Land Record Detail) हा अर्जासोबत जोडावा लागेल.
  • अर्जदाराने जर त्याच्या जमिनीची शासकीय मोजणी केली असेल तर शासकीय मोजणीच्या नकाशाची छायांकित प्रत किंवा मूळ नकाशा कागदपत्रांसोबत जोडावा लागेल.
  • अतिक्रमण केलेल्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील 7/12 अर्जासोबत जोडावा.
  • जर अतिक्रमण जमिनीच्या प्रकरणाचे न्यायालयात वाद सुरु असतील तर संबधित सर्व कागदपत्रे तहसीलदारकडे जमा करणे गरजेचं आहे.
  • तर वरील प्रमाणे सांगितलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावे. 
  • अर्जामध्ये गट नंबर, सर्व्हे नंबर व चतु:सीमा टाकणं गरजेचे आहे. तसेच अर्जाला योग्य किंमतीचा कोर्ट स्टॅम्प लावणं देखील गरजेचं आहे. तहसीलदार कार्यालयात पोचपावती घ्यावी. 

 

शेतजमिनीतील अतिक्रमण काढण्यासाठी

 👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Leave A Reply

Your email address will not be published.