Land Records Maharashtra | शेत जमिनीची व प्लॉटची संपूर्ण कुंडली पहा एका क्लिकवर

0

Land Records Maharashtra: जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. अनेक जण गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करतात. परंतु, असे व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही आणि यामुळे लाखो रुपयांना गंडा बसतो.

मागील काही दिवसांत जमिनीच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यावी. अनेक जमिनीवर किंवा प्लॉटवर बॅंकेचा बोजा असतो. तसेच जमीन किंवा प्लॉट वादग्रस्त आहे का? तसेच जमिनीचा किंवा प्लॉटचा न्यायालयात खटला सुरु आहे का? अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

 

तुमच्यासोबत फसवणूक होऊ नये यासाठी जमिनीचा व प्लॉटचा इतिहास माहित असणं आवश्यक आहे.‌ land record आता तुम्हाला जमिनीची संपूर्ण कुंडली पाहता येणार आहे.‌ यासाठी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आता तुम्हाला एका क्लिकवर जमीन किंवा प्लॉटची कुंडली पाहता येणार आहे.

आपल्या जमिनीचे रेकॉर्ड असे तपासा 

land records आधार कार्डमध्ये कसा नंबर असतो अशाप्रकारे आता जमिनींना सुद्धा आधार कार्ड सारखा नंबर देण्यात आला आहे. यालाच युनिक पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) असे म्हणतात. डिजिटल स्वरूपात असलेला सातबारा उतारा आणि युएलपीआयएन क्रमांक आपल्याला पाहता येतो.

तसेच सातबारा उताऱ्यावर QR कोड दिलेला असतो. हा QR कोड स्कॅन करुन सातबारा उतारा खरा आहे की खोटा तपासू शकता. त्यामधील सर्व नोंदी देखील दिसून जातील. आता राज्यातील गावांना एलजीडी कोड देण्यात आला आहे. यामुळे जमिनीची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती भूमि अभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.