Take a fresh look at your lifestyle.

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन; मृतांचा आकडा २१ वर, अनेक जण बेपत्ता

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

Himachal Pradesh Landslide : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे थैमान कायम असून, अनेक ठिकाणी नदी दुथडी भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या संकटामुळे आतापर्यंत २१ च्या (21 deaths) वर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सहा जण बेपत्ता असून बचाव दल त्यांचा शोध घेत आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून 34 ठिकाणी भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब-हिमाचल प्रदेश सीमेजवळील कांगडा जिल्ह्यातील रेल्वे ट्रॅकही (Railway track) कोसळला. मुसळधार पावसामुळे येथे नदीला पूर आला होता. त्यामुळे हा पूल कोसळला आहे. चंबा बनेत गावात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला.

गोविंदा आरक्षण : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त

उत्तराखंडमध्ये ढगफूटी

हिमाचल प्रदेशातील कांगडा (Kangra), चंबा (Chamba), बिलासपूर (Bilaspur), सिरमौर (Sirmaur) आणि मंडी (Mandi) या पाच जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.

आठवडाभर मध्यम ते मुसळधार पाऊस

हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील आठवडाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री जयमाराम ठाकूर यांनी भूस्खलन आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासन, बचाव आणि पुनर्वसन विभागाला तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात वीज संकट निर्माण होण्याची शक्यता; सरकारकडून उपाययोजना सुरु

७४२ रस्ते बंद, मदत जाहीर

हिमाचल प्रदेशातील सद्यस्थिती लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत २३२ कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. सध्याच्या पूरस्थितीमुळे येथील एकूण 742 रस्ते बंद करण्यात आले आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.