Take a fresh look at your lifestyle.

आता ‘असं’ करा तुमचं जन धन खातं आधार कार्डशी लिंक, मिळवा तब्बल 1.3 लाखांचा फायदा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – भारतात राहणाऱ्या लोकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card) अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. आज आधारशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. सरकारी असो की खाजगी सर्वांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. सरकारने प्रत्येक गोष्ट आधार कार्डशी लिंक केली आहे. या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहे. जानेवारी 2022 पर्यंत जन धन योजनेंतर्गत (Jan Dhan Account) उघडलेल्या बँक खात्यांची संख्या 44.23 कोटींवर पोहोचली आहे. या खात्यांमधील ठेवीही जानेवारीत दीड लाख कोटींहून अधिक होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2014 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.

जन धन खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक

जन धन बँक खातेधारकांना सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जात आहेत. जन धन खाते हे शून्य शिल्लक बचत खाते आहे. याशिवाय यात ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये खातेदारांना विमा संरक्षणही मिळते. जन धन खात्यात खातेदाराचे स्वतःचे आधार कार्ड लिंक करणे खूप महत्वाचे आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास अनेक वैशिष्ट्यांचे निलंबन होईल.

जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड दिले जाते. ज्यामध्ये एक लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण आहे. याशिवाय जनधन बँक खातेदाराला 30 हजार रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण देखील दिले जाते. जर तुमचे जन धन खाते आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकत नाही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते तात्काळ आधारशी लिंक करा.

आधार कार्ड आणि जन धन खाते कसे लिंक करावे?

सर्व प्रथम तुम्हाला ज्या बँकेत खाते लिंक करायचे आहे तेथे जा.

बँकेत जाताना आधार कार्डाची झेरॉक्स कॉपी सोबत ठेवा.

आधार आणि जन धन खाते लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.

त्यानंतर बँक तुमचे आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करेल.

Post Office पेन्शन योजना ऑनलाइन, ग्राहकांना घरबसल्या उघडता येणार नवीन खातं

एसएमएसद्वारेही लिंक करता येते

याशिवाय SMSद्वारेही लिंक करता येणार आहे. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवा. मेसेज बॉक्सवर जा आणि UID आधार क्रमांक, खाते क्रमांक टाइप करून 567676 क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमचे आधार आणि जनधन खाते लिंक होईल. याशिवाय तुम्ही दोन्ही बँकेच्या एटीएमशी लिंक करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.